शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या मदतीने सामान्यांना दिलासा : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 00:50 IST

केंद्र सरकारने गरीब कल्याण योजनेंतर्गत १.७० कोटींच्या विविध योजनांची घोषणा केली. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून नागपूर जिल्ह्यातील गरजूंना याचा लाभ होणार असल्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील गरजूंनाही लाभ

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना आपत्तीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या २१ दिवसाच्या बंद (लॉकडाऊन) दरम्यान केंद्र सरकारने गरीब कल्याण योजनेंतर्गत १.७० कोटींच्या विविध योजनांची घोषणा केली. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून नागपूर जिल्ह्यातील गरजूंना याचा लाभ होणार असल्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.बावनकुळे म्हणाले, आरोग्य विभागाचे डॉक्टर्स, अधिकारी, नर्सेस तसेच स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रति व्यक्ती ५० लाख रुपयांचा विमा केंद्र शासन काढणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत देशातील प्रत्येक गरिबाला ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ आणि १ किलो डाळ आगामी तीन महिने मोफत दिली जाणार आहे. याचा फायदा ८० कोटी जनतेला होईल. शेतकरी अडचणीत येऊ नये म्हणून २ हजार रुपये पुन्हा खात्यात जमा करण्यात येणार आहेत. हातमजुरी करणाऱ्यांना मनरेगांतर्गत मिळणारा रोजगाराचा दर हा १८२ रुपयांवरून २०२ रुपये करण्यात आला आहे. यामुळे मजुरांना आर्थिक दिलासा मिळेल.तसेच गरीब नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना एक हजार रुपये सानुग्रह अनुदान देऊन केंद्र शासनाने हा वर्गही दुर्लक्षित होऊ दिला नाही. जनधन खातेधारक महिलांना ५०० रुपये प्रतिमहिना आगामी ३ महिनेपर्यंत देण्यात येणार असल्यामुळे त्यांना दिलासा मिळेल. उज्ज्वला योजनेंतर्गत ८ कोटी महिलांना नि:शुल्क गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे.लघु उद्योगांना कोणतीही जमानत न घेता २० लाख रुपयांपर्यंत कर्ज केंद्र शासन उपलब्ध करून देणार आहे. संघटित क्षेत्रातील कामगारांच्या भविष्य निधीची रक्कम केंद्र शासन भरणार आहे. तसेच बांधकाम मजुरांसाठी ३१ हजार कोटींची योजना यावेळी घोषित करण्यात आली. गरीब आणि शेतकरी उपेक्षित राहून त्यांची आर्थिक कुचंबणा होणार नाही याची पूर्ण दखल केंद्र शासनाने घेतली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे