शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आंबेकरची सुटका वांध्यात

By admin | Updated: July 1, 2014 00:56 IST

न्यायालयाची फसवणूक केल्याच्या एका प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने नागपुरी डॉन संतोष आंबेकर याचा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. एस. परवाणी यांच्या न्यायालयातून प्रॉडक्शन वॉरंट प्राप्त केल्याने,

न्यायालय : ‘४२०’ च्या प्रकरणात पोलिसांनी घेतला प्रॉडक्शन वॉरंटनागपूर : न्यायालयाची फसवणूक केल्याच्या एका प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने नागपुरी डॉन संतोष आंबेकर याचा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. एस. परवाणी यांच्या न्यायालयातून प्रॉडक्शन वॉरंट प्राप्त केल्याने, त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातील सुटका वांध्यात आली आहे. नुकताच उच्च न्यायालयाने आंबेकर याचा अनिवासी भारतीय पराग रामचंद्र गोंधळेकर यांची श्रद्धानंदपेठ येथील कोट्यवधीची मालमत्ता बळकावल्याच्या आणि बिल्डर जितेंद्र चव्हाण यांना अंबाझरी पोलीस ठाण्यात पिस्तुलाचा धाक दाखवून ६५ लाखाची खंडणी चेकच्या स्वरूपात वसूल करण्याच्या प्रकरणात जामीन मंजूर केलेला आहे. आजच मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती ए. सी. राऊत यांच्या न्यायालयातून जामिनाची प्रक्रिया पूर्ण करून जेल अधीक्षकाच्या नावे सुटकेचा आदेश प्राप्त करण्यात आला. दरम्यान, आंबेकर हा सदर पोलीस ठाण्यात दाखल एका फसवणुकीच्या प्रकरणात पाहिजे असल्याने तपास अधिकारी पोलीस निरीक्षक एस. एन. मुरकुटे यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी परवाणी यांच्या न्यायालयातून आंबेकरचा प्रॉडक्शन वॉरंट प्राप्त केला. आंबेकरला कारागृहातून ताब्यात घेण्याचा हा आदेश आहे. असे होते फसवणुकीचे प्रकरणसंतोष आंबेकरचा भाचा शैलेश ज्ञानेश्वर केदार (२७) याच्याविरुद्ध डिसेंबर २०१३ मध्ये लकडगंज पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात शैलेश हा तब्बल चार महिने फरार राहिल्यानंतर, अटकपूर्व जामीन प्राप्त करण्यासाठी त्याने सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. शैलेश याने सिनेस्टाईलने आपल्या इतर साथीदार व नातेवाईकाच्या मदतीने पीडित मुलीच्या कुटुंबीयांवर दबाव आणून त्यांच्याकडून ती मानसिक रुग्ण असल्याचे खोटे शपथपत्र तयार करून घेतले होते. याशिवाय निधन झालेल्या डॉक्टरच्या बनावट सहीने पीडित मुलगी मानसिक रुग्ण असल्याचे प्रमाणपत्र तयार करून घेतले होते. शपथपत्र आणि प्रमाणपत्र त्याने न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जासोबत संलग्न केले होते. ही बनवाबनवी लक्षात येताच न्यायालयाने शैलेश याचा अर्ज फेटाळून लावला होता. याशिवाय न्यायालयाची फसवणूक झाल्याने शैलेश आणि साथीदारांविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात १० फेब्रुवारी २०१४ रोजी भादंविच्या ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हाही दाखल करण्यात आला होता. आंबेकरला २९ जानेवारी २०१४ रोजी अंबाझरी प्रकरणात अटक होताच शैलेशला या फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आंबेकरचे नाव असल्याने आता त्याला प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे कारागृहातून अटक केली जात आहे. (प्रतिनिधी)