एसआरएच्या लाभार्थीत नगरसेविकेचे नातेवाईक?
By Admin | Updated: November 23, 2015 02:41 IST2015-11-23T02:41:56+5:302015-11-23T02:41:56+5:30
झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या(एसआरए)लाभार्थीत नगरसेविका अनिता वानखेडे यांच्या नातेवाईकांचा समावेश असल्याने,

एसआरएच्या लाभार्थीत नगरसेविकेचे नातेवाईक?
नागपूर : झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या(एसआरए)लाभार्थीत नगरसेविका अनिता वानखेडे यांच्या नातेवाईकांचा समावेश असल्याने, त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी मिनीमातानगर येथील निवासी सुनंदा उके यांनी महापालिक ा आयुक्त यांच्याकडे केलेल्या तक्रारीतून केली आहे. या तक्र्रारीवर मंगळवारी २४ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
मिनीमातानगर परिसरात एसआरए योजना राबविली जात आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत स्थानिक नगरसेविका अनिता वानखेडे यांच्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत त्यांनी फ्लॅट घेतले आहेत. लाभार्थ्यांच्या यादीत पात्र नसलेल्यांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप माजी नगरसेवक अॅड. यशवंत मेश्राम यांनीही केला आहे. लाभार्थ्यांच्या यादीतील घोळामुळे तत्कालीन आयुक्त श्याम वर्धने यांनी या योजनेचे बांधकाम थांबिवले होेते. परंतु आता पुन्हा या योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे.या योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या व अन्य एका महिलेच्या मध्यस्थीने बोगस लाभार्थ्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गरजू व पात्र लाभार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप आहे. या योजनेसाठी पात्र असलेले लाभार्थी आज ट्रान्झिट कॅम्पमध्ये वास्तव्यास आहेत. परंतु यातील अनेक ांची लाभार्थ्यांच्या यादीत नावे नसल्याच्या अनेकांनी वैयक्तिक तक्रारी केल्या आहेत. (प्रतिनिधी)