लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत असताना दुसरीकडे विकृत घटना उत्तर प्रदेशात घडली. अलिगडमध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेच्या राष्ट्रीय सचिव पूजा शकून पांडेय यांनी बनावट बंदुकीने गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर पुतळ्यातून कृत्रिम रक्तही वाहायला लागले. हा पूर्णाकृती पुतळा जाळण्यात आला. इतकेच नव्हे तर या घटनेचे शुटींगही करवून प्रक्षोभक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्हेरायटी चौकातील गांधीजींच्या पुतळ्याजवळ निषेध सभा घेऊ न जोरदार नारेबाजी केली. तसेच या घटनेच्या विरोधात सीताबर्डी पोलिसात तक्रार दाखल करून दोषींच्या विरोधात गुन्हा दखल करून कठोर कारवाईची मागणी केली.शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, अॅड. अभिजित वंजारी, शहर काँग्रेसचे महासचिव संजय महाकाळकर, संदेश सिंगलकर, प्रशांत धवड, उपाध्यक्ष दिनेश बानाबाकोडे, गजराज हटेवार आदींनी हिंदू महासभेच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही यासंदर्भात निवेदन देण्यात आले.व्हिडिओच्या माध्यमातून देशातील जनमानसांच्या भावना दुखावून देशात हिंसा, दशहतवाद व अतिरेक निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याने दोषींच्या विरोधात भारतीय दंड कलम १४७, १४८, १५३ (अ), २९५ (अ), २८५, ५०४ आयटीआय अॅक्ट २००० नुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी मुख्य पोलीस निरीक्षकांना दिलेल्या तक्रारीतून केली. तसेच हिंदू महासभेच्या नागपूर येथील कार्यालयाची झडती घेऊन तेथे असलेली कागदपत्रे व शस्त्रास्त्रे जप्त करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीतून केली आहे.देशात भीतीचे वातावण निर्माण करण्याचा प्रयत्नपोलिसात तक्रार देण्यापूर्वी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अलिगड येथील घटनेचा तीव्र निषेध क रण्यात आला. जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचे काम भाजपा आणि त्यांच्या पूर्ण पाठबळ असलेल्या संघटना हिंदू महासभा, विश्व हिंदू परिषद, रा.स्व.संघ करीत आहेत. अशा घटना घडवून देशात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विकास ठाकरे यांनी यावेळी बोलताना केला. अशा प्रक्षोभक घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी वा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मौन बाळगून या घटनेला मूक पाठिंबा देत असल्याचा आरोप केला. यावेळी माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनीही मार्गदर्शन केले.आंदोलनात शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष शेख हुसैन, सेवादलाचे रामगोविंद खोब्रागडे, उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, रमेश पुणेकर, दीपक वानखेडे, देवा उसरे, सुजाता कोंबाडे, रेखा बाराहाते, रामगोविंद खोब्रागडे, किरण गडकरी, विठ्ठलराव कोंबडे, उज्ज्वला बनकर, विवेक निकोसे, श्रीकांत ढोलके, पंकज लोणारे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज निघोट, आशिष नाईक, विलास भालेकर, देवेन्द्रसिंह रोटेले, राजकुमार कमनानी, पंकज थोरात, सुरेंद्र रॉय, छाया सुखदेवे, अब्दुल शकील इर्शाद मलिक, जावेद खान, राकेश गुप्ता, इरफान काजी, गोपाल पट्टम, प्रशांत पाटील, युगल विदावत, विश्वेश्वर अहिरकर, बॉॅबी दहिवले, सुनील दहीकर, हर्ष सुखदेव शिव, प्रकाश ढगे, आशा शिंगोटे, स्नेहल दहीकर, अभय रणदिवे, प्रवीण गवरे, सुनिता ढोले, साहेबराव देशमुख, राजेश ढेंगे, सुभाष मानमोडे, कमाल मुखर्जी, प्रशांत ढाकणे, आलोक मून, अल्ताफ शेख, अभय सोमकुळे, आकाश तायवाडे, जिवेश व्यास यांनी परिश्रम घेतले. समारोप ‘रघुपती राघव राजाराम’ या भजनाच्या सामूहिक गायनाने करण्यात आला.