शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 09:49 IST

Nagpur Crime: गुटखा न देण्यावरून झालेल्या किरकोळ भांडणात दोन मित्रांनी १८ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला केला.

गुटखा न देण्यावरून झालेल्या किरकोळ भांडणात दोन मित्रांनी १८ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृताच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आर्यन विलास वहिले (वय, १८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आर्यनला ड्रग्जचे व्यसन होते आणि कोणालाही न कळवता घरातून निघून जायचा. घटनेच्या आठ दिवस आधी तो अशाच प्रकारे घरातून बेपत्ता झाला होता. दरम्यान, मंगळवारी एका व्यक्तीने आर्यन हा अजनी पोलीस ठाण्याजवळील फूटपाथवर बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे त्याच्या वडिलांना कळवले. त्यानंतर वडिलांनी त्याला घरी आणले, नारळ पाणी दिले आणि झोपवले. पण रात्री नऊ वाजताच्या सुमारास अचानक आर्यनची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

याप्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली. परंतु, बुधवारी एका तरुणाने आर्यनच्या वडिलांना सांगितले की, ९ जूनला रात्री आर्यनचे राहुल श्याम हजारे (वय, २४) आणि नागेश्वर उर्फ ​​सोनू श्यामराव मसराम (वय, २३) यांच्याशी भांडण झाले. आर्यनने त्यांना गुटखा मागितला. परंतु, त्यांनी नकार दिल्याने हाणामारी झाली. त्यावेळी राहुलने आर्यनवर लोखंडी रॉडने हल्ला केला. यानंतर आर्यनच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला. तसेच पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये डोक्याला खोल जखम झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे निश्चित झाले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र