अंकित शाहूला जामीन देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST2021-06-24T04:08:14+5:302021-06-24T04:08:14+5:30

नागपूर : उषा कांबळे व त्यांची चिमुकली नात राशी यांच्या निर्घृण खून प्रकरणातील आरोपी अंकित शिवभरण शाहू याने जामिनाकरिता ...

Refusal to grant bail to Ankit Shahu | अंकित शाहूला जामीन देण्यास नकार

अंकित शाहूला जामीन देण्यास नकार

नागपूर : उषा कांबळे व त्यांची चिमुकली नात राशी यांच्या निर्घृण खून प्रकरणातील आरोपी अंकित शिवभरण शाहू याने जामिनाकरिता दाखल केलेले अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले. न्यायमूर्तीद्वय हेमंत गुप्ता व अनिरुद्ध बोस यांनी हा निर्णय दिला.

या प्रकरणाचा मूळ खटला सत्र न्यायालयात प्रलंबित असून साक्षीदारांची तपासणी सुरू आहे. हा खटला येत्या डिसेंबरपर्यंत निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे राज्य सरकारचे वकील सचिन पाटील यांनी सांगितले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अंकित शाहूला जामीन देण्यास नकार दिला. तसेच, डिसेंबरपर्यंत खटला निकाली न निघाल्यास उच्च न्यायालयात नवीन जामीन अर्ज दाखल करण्याची अंकितला मुभा दिली.

प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये गणेश शाहू व त्याची पत्नी गुडिया ऊर्फ गुड्डी यांचा समावेश आहे. ही घटना १७ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली होती. घटनेच्या दिवशी मुख्य आरोपी गणेश व उषा कांबळे यांचा भिसीच्या सात हजार रुपयांवरून वाद झाला होता. त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीड वर्षीय राशीचाही निर्घृण खून केला. तसेच, दोघींचेही मृतदेह नाल्यात फेकून दिले. आरोपी पवनपुत्रनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत. फिर्यादी रविकांत कांबळे यांच्यावतीने ॲड. सचिन पुजारी, ॲड. राजेंद्र डागा व ॲड. समीर सोनवने यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Refusal to grant bail to Ankit Shahu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.