पेट्रोल-डिझेल दरवाढ त्वरित कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 21:33 IST2018-05-28T21:33:04+5:302018-05-28T21:33:15+5:30
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या दरवाढीविरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा टायगर फोर्सतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळातर्फे मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. यात पेट्रोल-डिझेल जीएसटीअंतर्गत आणावे आणि दरवाढ त्वरित कमी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढ त्वरित कमी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल-डिझेलच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या दरवाढीविरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा टायगर फोर्सतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळातर्फे मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. यात पेट्रोल-डिझेल जीएसटीअंतर्गत आणावे आणि दरवाढ त्वरित कमी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलनात मुकेश मासुरकर, विजया धोटे, हिमांशू देवघरे, अभ्युदय कोसे, पौर्णिमा भिलावे, तारेश दुरुगकर, विलास भिसीकर, अमोल जवळीकर, ऋषीकेश सेलोकर, राजेश बंडे, संदीप देशपांडे, शेखर पौनीकर, रोशन लारोकर, सचिन बिसेन, प्रकाश डेकाटे, अभिषेक गोरवे, आकाश पांडे, राहुल धाबे, मिलिंद खडगी, आकाश शेंडे, आकाश सहारे, सुशांत कुमार, हर्षल कळमकर, रतन नंदनवार आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.