शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
4
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
5
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
6
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
7
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
10
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
11
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
12
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
13
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
14
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
16
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
17
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
18
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
19
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
20
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला

विद्यापीठाची पद भरती बंद

By admin | Updated: August 11, 2016 01:56 IST

प्रशासकीय कामकाजामुळे अडचणीत सुरू असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला आपल्या निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आठवण आली आहे.

निवृत्त कर्मचारी आले कामावर : राज्यशासनाने नियुक्त्यांवर लावला अंकुश आशिष दुबे नागपूर प्रशासकीय कामकाजामुळे अडचणीत सुरू असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला आपल्या निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आठवण आली आहे. ठप्प झालेल्या कामकाजाचा निपटारा करण्यासाठी निवृत्त कर्मचाऱ्यांवर वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी सोपविण्यात येत आहे. आतापर्यंत १५० वरून अधिक सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना ४०० रुपये प्रतिदिन या प्रमाणे नियुक्ती देण्यात आली आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार सर्वाधिक नियुक्त्या परीक्षा विभागात करण्यात आल्या आहेत. याशिवाय शैक्षणिक विभाग, बीसीयुडी, विद्याशाखा आणि वित्त विभागात सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात आले आहे. काही कर्मचाऱ्यांना विद्यापीठाच्या रामदासपेठ येथील ग्रंथालयात नियुक्ती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीत कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने एक प्रस्ताव पारित केला आहे. येणाऱ्या दिवसात इतर विभागातही सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्याची योजना आहे. मागील काही दिवसांपासून परीक्षा विभागातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना आठवडाभरानंतर कंत्राटावंर त्याच विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली. २००८ मध्ये नव्या आकृतीबंधात विद्यापीठाच्या वर्ग ४ च्या सर्व पदांना गोठविण्यात आले. वर्ग ३ ची ३५० पदे रद्द करण्यात आली. वर्ग १ अंतर्गत येणाऱ्या सहायक कुलसचिव, उपकुलसचिवाच्या पदांची संख्या वाढविण्यात आली होती. नवा आकृतीबंध लागू झाल्यानंतर काही वेळातच राज्य शासनाने नव्या भरती प्रक्रियेवर बंदी घातली. त्यामुळे विद्यापीठातील रिक्त पदांची भरती होऊ शकली नाही. मागील तीन वर्षात प्रत्येक महिन्यात एकूण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत २० टक्के कर्मचारी निवृत्त होत आहेत. यामुळे विद्यापीठावर कामाचा ताण वाढला. आवश्यक अधिकारी नसल्यामुळे एका अधिकाऱ्यावर तीन विभागांची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु लिपीक, वरिष्ठ लिपीक आणि अधीक्षक नसल्यामुळे कामकाज ठप्प झाले होते. याचा सर्वात मोठा परिणाम परीक्षा विभाग व शैक्षणिक विभागाच्या कामकाजावर होत आहे. हे पाहून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर बोलविणे सुरू करण्यात आले. या दोन कारणांमुळे घेतले कामावर विद्यापीठ प्रशासनाच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यामागे दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे, त्यांना कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. दुसरे कारण म्हणजे विद्यापीठाच्या मते नव्या कर्मचाऱ्यांना कंत्राटावर नियुक्ती दिल्यास त्यांना नियमानुसार वेतन द्यावे लागते. जर एखाद्या कर्मचाऱ्याने प्रदीर्घ काम केल्यास तो कायमस्वरूपी नोकरीची मागणी करू शकतो. तो न्यायालयातही जाऊ शकतो. त्यामुळे या बाबी टाळण्यासाठी विद्यापीठाने हा उपाय शोधून काढला आहे. कामकाज सुरळीत करण्याला प्राधान्य विद्यापीठाचे कुलसचिव पुरण मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताचे समर्थन केले. त्यांनी सांगितले की, शासनाच्या निर्णयानंतर कामकाज चालविणे अवघड झाले होते. कामकाज सुरळीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नुकत्याच शासनाने ५० टक्के पदांना भरण्याची परवानगी दिली आहे. ते भरण्याची प्रक्रिया वेगाने राबविण्यात येईल.