शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या पहिल्या दिवशी मेट्रोत ‘रेकॉर्ड रायडरशिप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:12 IST

नागपूर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मेट्रो रेल्वेच्या प्रवाशांमध्ये अचानक वाढ झाली. १५,४११ पेक्षा अधिक प्रवाशांनी अ‍ॅक्वा लाईन मार्गावर प्रवास ...

नागपूर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मेट्रो रेल्वेच्या प्रवाशांमध्ये अचानक वाढ झाली. १५,४११ पेक्षा अधिक प्रवाशांनी अ‍ॅक्वा लाईन मार्गावर प्रवास केला. आतापर्यंतचा हा मोठा उच्चांक आहे. विशेष म्हणजे १ जानेवारी २०२१ रोजी छत्रपती मेट्रो स्टेशन येथील प्रस्तावित बांधकामासाठी ऑरेंज लाईन मार्गावर सीताबर्डी इंटरचेंज ते खापरीदरम्यान प्रवासी वाहतूक बंद होती. एकच मेट्रो लाईन असूनही प्रवाशांनी मेट्रोच्या प्रवासासाठी गर्दी केली होती.

अनलॉकनंतर मेट्रोच्या प्रवासी संख्येत सातत्याने वाढ होत आहे. नववर्षाच्या अखेरच्या रविवारी प्रवाशांनी मेट्रो रेल्वेत गर्दी केली होती. २२,१२३ प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला होता. इतर दिवशीही मेट्रोची प्रवासी संख्या १० हजारावर आहे. नागपुरात २५ किलोमीटर अंतराचे मेट्रोचे जाळे प्रवाशांसाठी उपलब्ध असून दर १५ मिनिटांनी मेट्रो रेल्वे प्रवाशांसाठी सज्ज राहते. सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी आणि सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रो सेवा उपलब्ध आहे. महामेट्रोच्या वतीने प्रवाशांसाठी विविध सोयीसुविधा मल्टी मॉडेल इंटिग्रेशन अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मेट्रो प्रवासासोबत आपली स्वत:ची किंवा फिडर सर्व्हिस म्हणजे उपलब्ध सायकलदेखील एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मेट्रो रेल्वेत नेता येऊ शकते. मेट्रो रेल्वेची सेलिब्रेशन ऑन व्हील्स या योजनेंतर्गत ३ हजार रुपयात ३ कोचच्या मेट्रो रेल्वेत वाढदिवस, प्री वेडिंग शुट, लग्नाचा वाढदिवस व इतर कार्यक्रम साजरे करणे शक्य झाले आहे. महामेट्रोच्या वतीने नववर्षानिमित्त न्यू ईअर कार्निव्हलचे आयोजन मेट्रो स्टेशन येथे करण्यात आले आहे. येथे विविध प्रकारचे १७ स्टॉल्स उपलब्ध आहेत. याशिवाय आयुर्वेदिक तसेच पर्यावरणपूरक वस्तूदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोयीसुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन महामेट्रोच्या वतीने करण्यात आले आहे.

..............