विदर्भात कोरोनाबाधितांचा रेकॉर्ड ; ६,२६५ रुग्ण पॉझिटिव्ह, ४४ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 22:57 IST2021-03-17T22:56:23+5:302021-03-17T22:57:21+5:30
Record of coronation victims in Vidarbha प्रशासनाकडून मोठमोठे दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. बुधवारी दैनंदिन रुग्णसंख्येने रेकॉर्ड तयार केला.

विदर्भात कोरोनाबाधितांचा रेकॉर्ड ; ६,२६५ रुग्ण पॉझिटिव्ह, ४४ मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रशासनाकडून मोठमोठे दावे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. बुधवारी दैनंदिन रुग्णसंख्येने रेकॉर्ड तयार केला. विदर्भात तब्बल ६ हजार २६५ नवे रुग्ण आढळले तर ४४ रुग्णांचा मृत्यू झाला. २४ तासांत रुग्णसंख्येमध्ये १ हजार १५२ ने वाढ झाली असून, मृत्यूसंख्या पाचने वाढली आहे. विभागात सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ८६ हजार ९५२ इतकी झाली आहे. नागपुरात तर सव्वा तीन हजारांहून अधिक पॉझिटिव्हची नोंद झाली. हा आतापर्यंतचा एका दिवसातील सर्वांत मोठा आकडा आहे. बुलडाण्यात बुधवारी रुग्णसंख्या परत वाढली. तेथे ६९० रुग्ण व ४ मृत्यूंची नोंद झाली. अकोल्यामध्येदेखील वाढ झाली व ४७० रुग्ण नोंदविले गेले. वर्धा येथे २५२, चंद्रपुरात १६४ तर यवतमाळमध्ये ४३५ रुग्णांची नोंद झाली.
बुधवारची आकडेवारी
जिल्हा : रुग्ण : मृत्यू
नागपूर : ३,३७० : १६
वर्धा : २५२ : ०५
गोंदिया : ३९ : ००
भंडारा : १४९ : ००
चंद्रपूर : १६४ : ०२
गडचिरोली : ३४ : ००
अमरावती : ४०६ : ०६
वाशिम : २४७ : ०१
बुलडाणा : ६९० : ०४
यवतमाळ : ४३५ : ०४
अकोला : ४७० : ०६