शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

नैतिकतेच्या शंखनादाचा विक्रम हुकला

By admin | Updated: April 8, 2016 02:45 IST

जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने कस्तुरचंद पार्क येथे गुरुवारी एड्स निर्मूलन महाजागरण अभियानात एकाचवेळी ५१,८४६ पेक्षा अधिक नागरिक ....

हजारो नागरिकांना नैतिकतेची शपथ : एड्सला आळा घालण्याचा संकल्प नागपूर : जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने कस्तुरचंद पार्क येथे गुरुवारी एड्स निर्मूलन महाजागरण अभियानात एकाचवेळी ५१,८४६ पेक्षा अधिक नागरिक सहभागी होऊ न नवीन जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न महापालिकेतर्फे करण्यात आला . परंतु अपेक्षित लोकांची गर्दी न जमल्याने नैतिकतेच्या शंखनादाचा जागतिक उपक्रम हुकला. परंतु उपस्थितीत हजारो नागरिकांना एकाचवेळी नैतिकता पाळून एड्स टाळण्याची शपथ देण्याचा संकल्प यशस्वी ठरला.व्यासपीठावर महापौर प्रवीण दटके, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, कार्यक्रमाचे संयोजक व सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, सभापती बाल्या बोरकर, सुनील अग्रवाल, आयुक्त श्रावण हर्डीकर, रमेश सिंगारे, डॉ. मेजर मिलिंद भुर्सुंडी, डॉ.संजय जयस्वाल, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे ऋषिनाथ आदी व्यासपीठावर होते. मुंबईच्या के .डी.वाय.पाटील स्टेडियम येथे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे २० डिसेंबर २०१३ रोजी आयोजित आरोग्य जनजागृती कार्यक्रमात ५१,८६१ नागरिकांनी सहभाग घेऊ न जागतिक विक्रम केला होता. गिनीज बुकात याची नोंद करण्यात आली आहे. याहून अधिक नागरिक एड्स जनजागृती कार्यक्रमात सहभागी होतील अशी अपेक्षा होती. परंतु अपेक्षित गर्दी जमली नाही.जनजागृती चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्नकॅन्सर, एड्स, मधुमेह यासारख्या आजाराची समस्या वाढत आहे. नागपूर शहरात २७ हजार एड्सग्रस्त आहेत. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने एड्सला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून एक चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विविध क्षेत्रातील ३०० संस्थांच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा संदेश देण्यात यश आले. योगदिन, संविधानदिन, नागपूर महोत्सव, आरोग्यदिन अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन क रण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने भव्य कार्यक्रमाचेही लवकरच आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी भाषणातून दिली. एड्सला आळा घालण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जनजागृती अभियानाचा नवीन विक्रम करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आला. नागरिकांनी याला प्रतिसाद दिला. परंतु न्यायालयाच्या निर्देशामुळे कार्यक्रमाचा प्रचार करता आला नाही. त्यामुळे नवीन जागतिक विक्रम करता आला नाही, अशी प्रतिक्रिया दयाशंकर तिवारी यांनी कार्यक्रमानंतर व्यक्त केली.सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. डॉ. मेजर मिलिंद भृशुंडी यांनी एड्स जनजागृतीवर सादरीकरण केले. प्रगती कला मंचच्या कलावंतांनी पथनाट्य सादर केले. यावेळी दयाशंकर तिवारी यांनी उपस्थित हजारो नागरिकांना ‘नैतिकता पाळा एड्स टाळा’ अशी शपथ दिली. या कार्यक्रमात महापालिका, महाराष्ट्र एड्स नियंत्रण कमिटी, रेडक्रॉस सोसायटी, आयएमआय, सार्वजनिक आरोग्य उपसंचालक विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)