नैतिकतेच्या शंखनादाचा विक्रम हुकला
By Admin | Updated: April 8, 2016 02:45 IST2016-04-08T02:45:24+5:302016-04-08T02:45:24+5:30
जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने कस्तुरचंद पार्क येथे गुरुवारी एड्स निर्मूलन महाजागरण अभियानात एकाचवेळी ५१,८४६ पेक्षा अधिक नागरिक ....

नैतिकतेच्या शंखनादाचा विक्रम हुकला
हजारो नागरिकांना नैतिकतेची शपथ : एड्सला आळा घालण्याचा संकल्प
नागपूर : जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने कस्तुरचंद पार्क येथे गुरुवारी एड्स निर्मूलन महाजागरण अभियानात एकाचवेळी ५१,८४६ पेक्षा अधिक नागरिक सहभागी होऊ न नवीन जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न महापालिकेतर्फे करण्यात आला . परंतु अपेक्षित लोकांची गर्दी न जमल्याने नैतिकतेच्या शंखनादाचा जागतिक उपक्रम हुकला. परंतु उपस्थितीत हजारो नागरिकांना एकाचवेळी नैतिकता पाळून एड्स टाळण्याची शपथ देण्याचा संकल्प यशस्वी ठरला.
व्यासपीठावर महापौर प्रवीण दटके, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त, कार्यक्रमाचे संयोजक व सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, सभापती बाल्या बोरकर, सुनील अग्रवाल, आयुक्त श्रावण हर्डीकर, रमेश सिंगारे, डॉ. मेजर मिलिंद भुर्सुंडी, डॉ.संजय जयस्वाल, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे ऋषिनाथ आदी व्यासपीठावर होते.
मुंबईच्या के .डी.वाय.पाटील स्टेडियम येथे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे २० डिसेंबर २०१३ रोजी आयोजित आरोग्य जनजागृती कार्यक्रमात ५१,८६१ नागरिकांनी सहभाग घेऊ न जागतिक विक्रम केला होता. गिनीज बुकात याची नोंद करण्यात आली आहे. याहून अधिक नागरिक एड्स जनजागृती कार्यक्रमात सहभागी होतील अशी अपेक्षा होती. परंतु अपेक्षित गर्दी जमली नाही.
जनजागृती चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न
कॅन्सर, एड्स, मधुमेह यासारख्या आजाराची समस्या वाढत आहे. नागपूर शहरात २७ हजार एड्सग्रस्त आहेत. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने एड्सला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून एक चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विविध क्षेत्रातील ३०० संस्थांच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा संदेश देण्यात यश आले. योगदिन, संविधानदिन, नागपूर महोत्सव, आरोग्यदिन अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन क रण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने भव्य
कार्यक्रमाचेही लवकरच आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी भाषणातून दिली.
एड्सला आळा घालण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जनजागृती अभियानाचा नवीन विक्रम करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आला. नागरिकांनी याला प्रतिसाद दिला. परंतु न्यायालयाच्या निर्देशामुळे कार्यक्रमाचा प्रचार करता आला नाही. त्यामुळे नवीन जागतिक विक्रम करता आला नाही, अशी प्रतिक्रिया दयाशंकर तिवारी यांनी कार्यक्रमानंतर व्यक्त केली.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. डॉ. मेजर मिलिंद भृशुंडी यांनी एड्स जनजागृतीवर सादरीकरण केले. प्रगती कला मंचच्या कलावंतांनी पथनाट्य सादर केले. यावेळी दयाशंकर तिवारी यांनी उपस्थित हजारो नागरिकांना ‘नैतिकता पाळा एड्स टाळा’ अशी शपथ दिली.
या कार्यक्रमात महापालिका, महाराष्ट्र एड्स नियंत्रण कमिटी, रेडक्रॉस सोसायटी, आयएमआय, सार्वजनिक आरोग्य उपसंचालक विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)