सखींना मिळणार लाखोंचे पुरस्कार

By Admin | Updated: June 19, 2016 02:59 IST2016-06-19T02:59:31+5:302016-06-19T02:59:31+5:30

लोकमत सखी मंचच्या २०१६ त्या सदस्य नोंदणीदरम्यान कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानच्या सहाकार्यने गोल्डन धमाका योजना सखी मंचच्या सदस्यांसाठी राबविण्यात आली होती.

Recipients of Millions of Rewards | सखींना मिळणार लाखोंचे पुरस्कार

सखींना मिळणार लाखोंचे पुरस्कार

लोकमत सखी मंच : कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानद्वारा
आयोजित उपक्रमात भव्य लकी ड्रॉ

नागपूर : लोकमत सखी मंचच्या २०१६ त्या सदस्य नोंदणीदरम्यान कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानच्या सहाकार्यने गोल्डन धमाका योजना सखी मंचच्या सदस्यांसाठी राबविण्यात आली होती. या योजनेत १५ मार्च ते १५ मेपर्यंत प्रत्येक दिवशी एक कूपन प्रकाशित करण्यात आले. सदस्य नोंदणी दरम्यान प्रत्येक सदस्याला याची प्रवेशिकाही देण्यात आली होती. प्रकाशित झालेले कूपन या प्रवेशिकेवर चिपकवून २५ मे पर्यंत लोकमत कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या योजनेला सखींकडून प्रचंड प्रतिसाद लाभला. जमा झालेल्या प्रवेशिकांमधून भाग्यशाली लकी ड्रॉ २० जून रोजी डॉ. देशपांडे सभागृहात सायंकाळी ५ वाजता काढण्यात येणार आहे.
यात प्रथम पुरस्कार ५१ हजार रुपयांचे सोन्याचे नेकलेस, द्वितीय पुरस्कार २१ हजार रुपयांचा सोन्याचा अलंकार, तृतीय पुरस्कार ११ हजार रुपयांचे दागिने, चौथा पुरस्कार ७ हजार रुपयांचा आणि पाचवा पुरस्कार ५ हजार रुपयांच्या दागिन्यांचा आहे. या कार्यक्रमात कोण भाग्यशाली सखी आहेत ते कळणार आहे. याच कार्यक्रमात रायसोनीतर्फे नटसम्राट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एकल अभिनय स्पर्धा हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल. यात लहान मुले वय वर्षे ६ ते १४ वर्षे, महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी १४ ते २६ वर्षे आणि १८ वर्षापेक्षा अधिक वयाच्या महिला सहभागी होऊ शकतात. कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सदस्यांनी ९८५०३०४०३७, ९९२२९६८५२६ आणि ९९२२९१५०३५ या क्रमांकावर एसएमएस करून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आणि नि:शुल्क आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Recipients of Millions of Rewards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.