शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरांनो अर्ज मागे घ्या, अन्यथा कारवाई होणार भाजप प्रदेशाध्यक्षांचा इशारा

By योगेश पांडे | Updated: October 31, 2024 20:48 IST

नागपुरात गुरुवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नागपूर : विधानसभा निवडणूकीत महायुती व महाविकासआघाडीचे नेते पक्षांमधील बंडखोरीमुळे हैराण झाले आहेत. भाजपने तर बंडखोरांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे निश्चित केले आहे. जर बंडखोरांनी अर्ज मागे घेतले नाहीत, तर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. नागपुरात गुरुवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

एका मतदारसंघातून एक व्यक्तीच उमेदवारी अर्ज भरू शकतो. ज्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी तिकीट न मिळाल्यानंतरदेखील उमेदवारी अर्ज भरले आहेत, त्यांनी त्यांच्या भावना यातून व्यक्त केल्या आहेत. निवडणूक संचालन समितीने अशा पदाधिकाऱ्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे अर्ज मागे घेतले जातील असा विश्वास आहे. मात्र जे अर्ज मागे घेणार नाहीत त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल असे बावनकुळे यांनी सांगितले.महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शरद पवार आणि कॉंग्रेसने फसवणूक केली आहे. रामटेक मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराची जमानत जप्त करण्यासाठी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक लढत आहेत. रामटेकमध्ये उद्धव ठाकरेंचा ठरवून अपमान करण्यात येत आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला. महाविकास आघाडीमधील कॉंग्रेसचा जिल्हाध्यक्ष बंडखोरी करीत असताना तो नाना पटोले यांना का दिसत नाही असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे यांचा भाजपाकडून सन्मान केला जात होता. त्यांना बरोबरीने आणि भाजपापेक्षा अधिक जागा देत लोकसभा निवडणुकीत त्यांचे अठरा खासदार निवडून आले होते. आता ते मुख्यमंत्री पदाच्या लोभामुळे फसले आहेत. त्यांनी आपला हिंदुत्वाचा विचार सोडला आहे, असा आरोप बावनकुळे यांनी केला.

मनोज जरांगे यांचे आंदोलन सामाजिक असून राजकारणाशी जोडू नये. सत्तेमुळे समाजाला न्याय मिळतो. भाजपाने मराठा समाजासोबत न्यायाची भूमिका ठेवली आहे, असेदेखील ते म्हणाले.