शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील ३२ मतदारसंघात बंडखाेरांनी थोपटले दंड; स्वपक्षीयांचा होईल कमीअधिक त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 13:51 IST

Nagpur : निम्म्या जागांवर आघाडी, महायुतीच्या उमेदवारांपुढे तगडे आव्हान

राजेश शेगाेकारनागपूर : विधानसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या क्षणापर्यंत अनेक मतदारसंघांमधील बंडाळी माेडून काढण्यात महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांना यश आले असले तरी तांत्रिकदृष्ट्या विदर्भातील ६२ पैकी ३२ मतदारसंघात बंडखाेरांनी अर्ज कायम ठेवले आहेत. परिणामी, महाविकास आघाडीच्या २२ उमेदवारांना तर महायुतीच्या २० उमेदवारांना स्वपक्षीयांचा कमीअधिक त्रास होईल, अशी चिन्हे आहेत. १५ जागांवर मात्र आघाडी व महायुतीच्या उमेदवारांपुढे बंडखोरांचे तगडे आव्हान राहील. बंडखाेरांचा राग शांत करण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून विशेष दूत गेल्या दाेन दिवसांपासून कार्यरत हाेते. त्यामुळे विदर्भात बहुतेक ठिकाणी बंडाेबांचे ‘थंडाेबा’ झाल्याची चित्र आहे. उमेदवारी नाकारलेल्या अनेक माजी आमदारांनी अर्ज मागे घेतलेत, मात्र तरीही पक्षातील महत्त्वाकांक्षी नेत्यांनी श्रेष्ठींचे न ऐकता उमेदवारी कायम ठेवत बंड पुकारले आहे. बंडखोरांनी दंड थोपटलेल्या मतदारसंघांमध्ये नागपूर मध्य, नागपूर पूर्व, रामटेक, काटाेल, सावनेर, उमरेड, कामठी, अहेरी, आरमाेरी, बल्लारपूर, वराेरा, सकाेली, तुमसर, राळेगाव, वणी, उमरखेड, अमरावती, बडनेरा, माेर्शी, अचलपूर, मेळघाट, वर्धा, हिंगणघाट, बुलढाणा, सिंदखेड राजा, रिसोड, वाशीम, अकोला पश्चिम, बाळापूर, आकोटचा समावेश आहे

माेर्शी, सिंदखेडराजात 'सांगली पॅटर्न'

लाेकसभेतील मैत्रीपूर्ण लढतीचा 'सांगली पॅटर्न' या वेळी अमरावती जिल्ह्यातील माेर्शी व बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मतदारसंघात पाहायला मिळत आहे. माेर्शीमध्ये महायुतीकडून अजित पवार गटाने देवेंद्र भुयार यांना तर भाजपने उमेश यावलकर यांना उमेदवारी दिली आहे. सिंदखेडराजामध्ये शिंदेसेनेचे माजी आमदार शशिकांत खेडेकर आणि अजित पवार गटाचे मनाेज कायंदे हे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. महायुतीत या दाेन्ही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होईल. 

१५ मतदारसंघात रंगणार चुरस नागपूर मध्य, रामटेक, अहेरी, आरमाेरी, बल्लारपूर, तुमसर, उमरखेड, अमरावती, बडनेरा, माेर्शी, वर्धा, हिंगणघाट, सिंदखेड राजा, रिसोड, अकोला पश्चिम या १५ मतदारसंघांमध्ये मात्र बंडखोरांचे तगडे आव्हान आहे. भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी हलबा समाजाला उमेदवारी न दिल्याने नाराजांनी एकत्र येऊन रमेश पुणेकर यांना नागपूर मध्य मतदारसंघात उतरविले आहे. रामटेकमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी उद्धवसेनेचे विशाल बरबटे यांच्या विरोधात उमेदवारी कायम ठेवली आहे. अहेरीत मतदारसंघात भाजपचे अंबरीशराव आत्राम यांनी महायुती धर्म नाकारून धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात बंडाचा झेंडा उंचावला आहे. आरमाेरी मतदारसंघात माजी आमदार आनंदराव गेडाम, तुमसरमध्ये माजी आमदार सेवक वाघाये, उमरखेडमध्ये माजी आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार विजय खडसे, अमरावतीत माजी आमदार जगदीश गुप्ता, रिसाेडमध्ये माजी आमदार अनंतराव देशमुख, हिंगणघाटमध्ये माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांचे अधिकृत उमेदवारांपुढे आव्हान आहे. ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचे चिरंजीव अमोल यांनी सावनेरमध्ये, नागपूर पूर्वमध्ये आभा पांडे, बडनेऱ्यात प्रीती संजय बंड यांची बंडखोरी कायम आहे. तिथे आमदार रवी राणा यांच्यापुढे भाजपचे तुषार भारतीय यांंनी शड्डू ठोकला आहे. मोर्शीत काँग्रेसचे विक्रम ठाकरे यांनी शरद पवार गटाचे गिरीश कराळे यांच्या विरोधात अर्ज कायम ठेवला आहे. बल्लारपूरमध्ये काँग्रेसच्या डाॅ. अभिलाषा गावतुरे, अकाेला पश्चिममध्ये भाजपचे हरिश आलिमचंदानी व उद्धवसेनेचे राजेश मिश्रा अपक्ष लढतीत आहेत. वर्धा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार शेखर शेंडे यांच्यापुढे डाॅ. सचिन पावडे  यांचे आव्हान असेल.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024nagpurनागपूर