‘म्हादु : एक मिथक’मधून जगण्याच्या वास्तवाचा शोध
By Admin | Updated: June 2, 2014 02:15 IST2014-06-02T02:15:55+5:302014-06-02T02:15:55+5:30
छायाचित्रकार म्हणून काम करताना प्रत्येकच क्षेत्रातील छायांकन करत गेलो.

‘म्हादु : एक मिथक’मधून जगण्याच्या वास्तवाचा शोध
नागपूर : छायाचित्रकार म्हणून काम करताना प्रत्येकच क्षेत्रातील छायांकन करत गेलो. व्यवसाय आणि आवड म्हणूनही त्यात रमलो. पण कधी-कधी काही प्रश्न आपल्या संवेदनशील मनाला बोचतात, अस्वस्थ करतात. या अस्वस्थतेतूनच माझ्या मनात एक कथा आकार घेत होती. मी ती कथा लिहिली आणि त्यात मला व्हिज्युअल्स दिसले. स्वाभाविकपणे छायाचित्रकार असल्याने सिनेमा या माध्यमाकडेच मी ओढला गेलो. पण मला नेमकेपणाने जे सांगावेसे वाटत होते ते मांडल्याचे समाधान मिळत नव्हते. या प्रवासात महाश्वेतादेवी यांची कथा वाचनात आली आणि ती कथाच माझ्या चित्रपटाचा विषय झाली, असे मत माझी मांडणी जरा बटबटीत आणि ढोबळ होती. मलाही तेच जाणवायचे. त्याला हवी असलेली धार यावी म्हणून ती एका सुप्रसिद्ध लेखकाला दाखविली. या विषयावर महाश्वेतादेवी यांची कथा आहे. ती कथा मी प्रथम वाचावी, असा सल्ला त्यांनी मला दिला. त्यांची ती कथा वाचल्यावर मात्र प्रभावित झालो आणि हा चित्रपट निर्माण झाला. या कथेच्या निमित्ताने आदिवासींचे जगणे, त्यांचे प्रश्न, वास्तव या सार्यांचा अभ्यास मला करावा लागला. त्यासाठी विदर्भात वर्षभर माझे निरीक्षण सुरू होते. त्यांना भेडसावणारा आणि आंदोलीत करणारा नक्षलवाद या सार्याच पार्श्वभूमीवर माझ्या अभ्यासाला पैलू पडले पण हा चित्रपट नक्षलवादावर असण्यापेक्षा आदिवासींच्या जीवनाशी संबंधित आहे. साम्राज्यवादी मानसिकतेतून नैसर्गिक संपत्तीची होणारी लूट आजही अव्याहतपणे सुरूच आहे. त्यात आदिवासी आजही बळी पडत आहे. या केंद्रस्थानाभोवती ही कथा रसिकांना नक्की विचार करायला भाग पाडणारी आहे, असा विश्वास भंडारे यांनी व्यक्त केला. या चित्रपटाचे संगीत स्वानंद राजाराम यांनी केले आहे तर याचे चित्रिकरण पुणे परिसरात करण्यात आले. आज या चित्रपटाचा एक शो पर्सिस्टंट कंपनीच्या कालिदास सभागृहात, आयटी पार्क येथे निर्झर फिल्म सोसायटीच्यावतीने आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रफुल्ल शिलेदार आणि दिनकर बेडेकर यांनी संदेश भंडारे यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर नाफडे यांनी केले. निर्मिती परिमल चौधरी यांनी केली आहे. (प्रतिनिधी)