जागतिक दर्जाच्या सांस्कृतिक हबचे स्वप्न साकार

By Admin | Updated: August 20, 2014 01:07 IST2014-08-20T01:07:46+5:302014-08-20T01:07:46+5:30

शहराच्या हृदयस्थानी हिस्लॉप कॉलेजलगतच्या ‘चिटणवीस सेंटर’ची गणना जागतिक दर्जाचे सांस्कृतिक हब म्हणून होऊ लागली आहे. चिटणवीस सेंटरची पाहणी करताना शांत आणि विस्मय असे दोनच

Real world dream of cultural hub | जागतिक दर्जाच्या सांस्कृतिक हबचे स्वप्न साकार

जागतिक दर्जाच्या सांस्कृतिक हबचे स्वप्न साकार

अद्ययावत सोयीसुविधांनी परिपूर्ण : प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन
नागपूर : शहराच्या हृदयस्थानी हिस्लॉप कॉलेजलगतच्या ‘चिटणवीस सेंटर’ची गणना जागतिक दर्जाचे सांस्कृतिक हब म्हणून होऊ लागली आहे. चिटणवीस सेंटरची पाहणी करताना शांत आणि विस्मय असे दोनच शब्द मनात येतात. बाहेरील भागात व्हिक्टोरियन स्टाईलचे लालविटांचे आर्किटेक्चर तर आतील भाग अद्ययावत व आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. सेंटरमुळे नागपूरकरांचे जागतिक दर्जाच्या कन्व्हेन्शन सेंटरचे स्वप्न साकार झाले आहे.
ही जागा बहुउपयोगी आणि सुंदर आहे. सेंटरमध्ये परिषद, प्रदर्शन, चर्चासत्र, कार्यक्रम, आॅर्ट डिस्प्ले, प्रशिक्षण सत्र, सामाजिक स्नेहसंमेलन याशिवाय लग्नसमारंभही उत्साहात पार पडू शकतात. बोर्ड रूम ते अशोक प्रशिक्षण हॉल, चिटणवीस सेंटर, छोटे, मध्यम व मोठे सहा वातानुकूलित हॉल तसेच आॅडिओ-व्हिडिओ सादरीकरण करता येते.
रंगायन या आर्ट गॅलरीत १०० पेंटिंग प्रदर्शित करता येतात. विस्तीर्ण पार्किंग व १६ हजार चौ.फूट लॉन आहे. सेंटरमध्ये अनेक प्रदर्शन यशस्वीरीत्या झाले आहेत. गुणवत्तेच्या सेवेमुळे नोंदणी संख्या वाढत आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Real world dream of cultural hub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.