देशाचा खरा ‘आयर्नमॅन’....
By Admin | Updated: July 27, 2015 04:20 IST2015-07-27T04:20:32+5:302015-07-27T04:20:32+5:30
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक तरुणांचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या स्टडी सर्कलचे संचालक डॉ.

देशाचा खरा ‘आयर्नमॅन’....
नागपूर : स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक तरुणांचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या स्टडी सर्कलचे संचालक डॉ. आनंद पाटील यांनी अलीकडेच आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन (ट्रायथलॉन) व कॉमरेट स्पर्धेत नवा विक्रम नोंदवून देशाचा मान वाढविला आहे. आतापर्यंत डॉ. आनंद पाटील म्हणजे, ‘करिअर गुरू ’ एवढाच त्यांचा देशाला परिचय होता. परंतु या स्पर्धांच्या माध्यमातून त्यांनी आपण एक उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडूही असल्याचे सिद्ध करू न दाखविले आहे. यानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील अनुभव कथन केले.
नॅशनल ट्रायथलॉन फेडरेशनच्या माध्यमातून स्वित्झर्लंडमधील ज्युरिच येथे नुकत्याच १९ जुलै रोजी आयरनमॅन (ट्रायथलॉन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील तीन हजार लोकांनी भाग घेतला होता. त्यापैकी १५०० लोकांनी कॉम्पेट केले असून त्यात भारतातील डॉ. आनंद पाटील यांच्यासह मिलिंद सोमण, हिरेन पटेल, कौस्तुभ राडकर व पृथ्वीराज पाटील या पाच खेळाडूंचा समावेश होता. तब्बल १५ तास ५३ मिनिट चाललेल्या स्पर्धेत ३.४ किलोमीटर स्विमिंग, त्यानंतर १८० किलोमीटर सायकलिंग व लगेच ४२ किलोमीटरची रनिंग असे या स्पर्धेचे स्वरू प होते. याशिवाय ३१ मे रोजी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कॉमरेट स्पर्धेत डॉ. पाटील यांनी दुसरे स्थान पटकाविले आहे. डॉ. पाटील म्हणाले, ‘आयरनमॅन-ट्रायथलॉन’स्पर्धेचा तो दिवस माझ्या जीवनातील सर्वात मोठा दिवस ठरला. स्पर्धेच्या दिवशी सकाळी ४ वाजता उठून सर्वप्रथम थंड पाण्याने आंघोळ केली. यानंतर ४.१५ वाजता नाश्ता करू न लगेच ज्युरिच तलावाच्या परिसरात पोहोचलो. सकाळी ७ वाजताच्या सुमारास स्विमिंग स्पर्धेला सुरुवात झाली. दरम्यान, अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेक स्पर्धक मला मागे टाकून पुढे निघत होते. त्यांना पाहून आजचा दिवस आपला नाही, असा विचार मनात आला. परंतु हिंमत हरलो नाही, आणि दुसऱ्या टप्प्यातील एका तासात २.२ किलोमीटरचे अंतर पूर्ण करू न सकाळी ९ वाजता सायकलिंग स्टेशन गाठले. यानंतर लगेच सायकलिंग स्पर्धा सुरू झाली. यातही अनेक संकटाचा सामना करावा लागला. काहीच अंतरावर सायकलचे मागील चाक अचानक जॅम झाले. त्यामुळे सायकल स्लिप होऊन, सायकलीसह मी सुद्धा खाली पडलो. यात सायकलचे नुकसान होऊन, सहा स्पोक तुटले होते. यानंतर स्पर्धेच्या आयोजकांनी मदत करू न, ते चाक बदलून दिले. मात्र यात सुमारे ५० मिनिट व्यर्थ गेले. यामुळे थकवा आला होता. तरीही हार मानली नाही, अन् स्पर्धा पूर्ण केली. केवळ मिलिंद सोमण ५० वर्षांचा असून, मी मात्र पन्नाशी ओलांडलेला होतो.(प्रतिनिधी)
आता आॅस्ट्रेलियातील स्पर्धेची तयारी
४ज्युरिच येथील आयरनमॅन (ट्रायथलॉन), दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉमरेट’ व पोर्ट एलिझाबेथ येथील स्पर्धांमध्ये भारताचा झेंडा फडकविल्यानंतर आता येत्या डिसेंबरमध्ये आॅस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या ‘आयरनमॅन’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केल्याचे यावेळी डॉ. पाटील म्हणाले. यासाठी ते रोज दोन ते तीन तास नियमित व्यायाम करतात. यासाठी त्यांनी आपल्या काही डॉक्टर मित्राचा एक ग्रुप तयार केला आहे. विशेष म्हणजे, यातून आपल्या कार्यक्षमतेत कमालीची वाढ झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठी तरुण ‘अभिव्यक्ती’त मागे
४यानिमित्त डॉ. पाटील यांना मराठी तरुण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत मागे का पडतो? असा प्रश्न केला असता, ते म्हणाले, मराठी तरुण हा हुशार आहे, त्याला भरपूर ज्ञानही आहे. मात्र तो नेहमी ‘अभिव्यक्ती’मध्ये मागे पडतो. त्याला आपले ज्ञान योग्यप्रकारे मांडता येत नाही. स्पर्धा परीक्षांसाठी संतुलित व सकारात्मक विचार हवे असतात. स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास असतो. या दिशेने तरुणांनी तयारी केल्यास त्यांना नक्कीच यश मिळू शकते.