शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू : अंघोळीचा मोह अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 8:30 PM

Brothers Drowning death, Nagpur News अंघोळीसाठी तलावात उतरलेला धाकटा भाऊ खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्याने त्याला वाचविण्यासाठी थोरला पाण्यात गेला. मात्र, पोहता येत नसल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला.

ठळक मुद्दे नागपूर जिल्ह्यातील साळवा येथील तलावातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कुही) : अंघोळीसाठी तलावात उतरलेला धाकटा भाऊ खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्याने त्याला वाचविण्यासाठी थोरला पाण्यात गेला. मात्र, पोहता येत नसल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना साळवा (ता. कुही) परिसरात असलेल्या तलावात शनिवारी (दि. ३) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. दोघेही नागपूर शहरातील रहिवासी आहेत.सनी शिवशंकर शाहू (१९) व वीरेंद्र शिवशंकर शाहू (१६) रा. कळमना, नागपूर, अशी मृत भावांची नावे आहेत. दोघेही कबाडी साहित्य विकत घेण्यासाठी गावोगाव फिरत असल्याने ते शनिवारी साळवा येथे आले होते. सकाळी गावात फिरले आणि दुपारच्या सुमारास गावालगतच्या तलावाजवळ गेले. हा तलाव पाण्याने पूर्ण भरला आहे. आपण अंघोळ करू म्हणत वीरेंद्र तलावात उतरला.क्षणार्धात तो खोल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागला. तो पाण्यात दिसेनासा झाल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी सनी पाण्यात उतरला. तोही गटांगळ्या खाऊ लागला. हा प्रकार तलावाशेजारी गुरे चारत असलेल्या गुराख्याच्या निदर्शनास आला. त्याने लगेच पोलीस पाटील मेश्राम यांना माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून स्थानिकांच्या मदतीने त्यांचे शोधकार्य सुरू केले. काही वेळाने दोघांनाही शोधून काढण्यात त्याना यश आले. मात्र, तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी कुही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू