शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

लग्न करण्यासाठी बनला ‘रॉ’ एजंट, मुंबई पोलिसांच्या खबऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 05:36 IST

२४ तास चालले नाट्य : मुंबई पोलिसांच्या खबऱ्याला अटक

नागपूर : लग्न करण्यासाठी स्वत:ला ‘रॉ’ एजंट असल्याचे सांगून मुंबई पोलिसांच्या एका खबºयाने शहर पोलिसांची झोप उडविली. २४ तास चाललेल्या या ‘ड्रामा’नंतर युवकाचा बोगसपणा उघडकीस आला. गिट्टीखदान पोलिसांनी त्याला अटक केली आहे. इमरान खान नूर मोहम्मद खान (३९ रा. शिवाजीनगर गोवंडी मुंबई) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार इमरान हा मुंबई पोलिसांचा खबरी म्हणून काम करतो. त्यामुळे त्याला पोलीस आणि गुन्हेगारी जगताची माहिती आहे. तो घटस्फोटित आहे. दोन महिन्यापूर्वी त्याची गिट्टीखदान परिसरातील एका ३५ वर्षीय महिलेसोबत ओळख झाली. इमरानने स्वत:ची ओळख ‘रॉ’ एजंट म्हणून दिली. इमराननेतिला लग्नाची मागणी घातली. महिलेनेही ती स्वीकारली. तो तिला भेटण्यासाठी १५ दिवसापूर्वी नागपुरात आला. लग्न करणार असल्याने तो तिच्या घरीच कुटुंबीयांसोबत राहू लागला.

वेगवेगळी कारणे सांगून त्याने १५ दिवसांत महिलेकडून ३० हजार रुपये घेतले. त्याच्या एकूणच व्यवहारावरून महिलेला संशय आला. तिने मंगळवारी इमरानच्या आई-वडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु आई-वडिलांचा मृत्यू झाल्याचे व घरी त्याच्याशिवाय दुसरे कुणीही नसल्याचे सांगितले. यानंतर महिलेने त्याला ‘रॉ’चे ओळखपत्र दाखविण्यास सांगितले. यावर तो कुठलेही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. यामुळे तिचा संशय आणखीनच वाढला. त्यातून इमरान दुखावला गेला आणि इमरान स्वत: गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गेला. त्याने आर्थिक शाखेच्या डीसीपी श्वेता खेडकर आणि अतिरिक्त महासंचालक अर्चना त्यागी यांनाही फोन केला. आपण ‘रॉ’ एजंट असल्याचे सांगून लग्नासाठी मदत करण्यास सांगितले. दोन्ही अधिकाऱ्यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याशी संपर्क केला. यानंतर पोलीसही खडबडून जागे झाले. गिट्टीखदान पोलीस इमरानला घेऊन ठाण्यात आले. एपीआय सुदर्शन गायकवाड यांनी बुधवारी दिवसभर इमरानला विचारपूस केली. त्यावरून त्याचा ‘रॉ’शी कुठलाही संबंध नसल्याचे आढळून आले.दुसºयांना प्रभावित करण्यात इमरान तरबेजइमरानच्या बोलण्यावर कुणीही संशय घेऊ शकत नाही. तो इंग्रजीसह आठ भाषांचा जाणकार आहे. त्याच्या बोलण्याने कुणीही सहजपणे प्रभावित होऊ शकतो. यामुळेच महिला व तिचे कुटुंबीयसुद्धा प्रभावित झाले होते. त्याच्या बोलण्यामुळे सुरुवातीला पोलीसही चक्रावून गेले होते. त्याच्या सांगण्यानुसार जेव्हा मुंबईतील काही पोलीस अधिकाºयांशी संपर्क साधला असता इमरान पोलिसांचा खबरी असल्याचे उघडकीस आले.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस