शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

रामबाग कॉलनीत आढळले दुर्मिळ रक्तलोचन घुबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2023 18:01 IST

रामबाग कॉलनी समोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपी परिसरात शुक्रवारी दुर्मिळ रक्तलोचन घुबड सापडले.

आनंद डेकाटे नागपूर: रामबाग कॉलनी समोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपी परिसरात शुक्रवारी दुर्मिळ रक्तलोचन घुबड सापडले. त्याची प्रकृती बरी नव्हती. अशा अवस्थेत घुबड सापडल्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जाते. रामबाग परिसरात डी.एस रॉयल इनफिल्ड सर्विस सेंटरचे इमरान शेख यांना झुडपी परिसरातील आकाशात कावळे मोठ्या प्रमाणावर आढळून आले. ते जमिनीच्या दिशेने येऊन काव-काव करीत होते. इमरान यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना एक मोठे जंगली घुबड आढळून आले. लोकांनी गर्दी केली. सर्पमित्र अललेले आशीष मेंढे, पियुष पुरी व मयुर कुरटकर यांना याबाबतची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. तेव्हा हे घुबड आजारी असल्याचे लक्षात आले. घुबडाचे नख खुप मोठे असल्याने त्याला सुरक्षितपणे बाहेर काढून अत्यावश्यक उपचारासाठी वनविभागाकडे सोपवले.

माजी पशुकल्याण अधिकारी स्वप्नील बोधाने यांनी या घुबडाविषयी माहिती देताना सांगितले की, हे घुबड दुर्मिळ जातीत मोडणारे "mottled wood owl" (रक्तलोचन घुबड) आहे. या घुबडाला वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अनुसार शेड्युल - १ अंतर्गत संरक्षण प्राप्त आहे.

रक्तलोचन घुबड ओळखण्याची खूण म्हणजे याच्या वरील बाजूस पांढरे व तांबूस चट्टे असतात.तर खालील बाजू पांढुरकी असून त्यावर गडद तपकिरी रेषा तसेच लालसर-तपकिरी चट्टे व पट्टे असतात. फिक्कट चपट्या चेहऱ्यावर काळ्या वर्तुळाकार रेषा व डोळे गडद असतात. या घुबडाचे मुख्य खाद्य खारी, छोटे सरपटणारे प्राणी, उंदीर, सरडे, खेकडे, कीटक आहेत. हा पक्षी निशाचर असून झुडपी तसेच जंगल क्षेत्रात वास्तव्याला असतो. 

टॅग्स :nagpurनागपूर