शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

शिक्षण संस्थेच्या बलात्कारी संचालकाचा जामिन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 10:15 PM

निराधार महिलेला पैशाचे आमिष दाखवून तिच्या मदतीने तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा शिक्षण संस्थेचा संचालक अशोक जयस्वाल (वय ५०) याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.

ठळक मुद्देअटक टाळण्याचा प्रयत्न उधळलापोलिसांकडून जागोजागी शोधाशोधहैदराबाद, मुंबई कनेक्शनची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:च्या शेतातील आउट हाउसमध्ये ठेवलेल्या निराधार महिलेला पैशाचे आमिष दाखवून तिच्या मदतीने तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा शिक्षण संस्थेचा संचालक अशोक जयस्वाल (वय ५०) याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. दरम्यान, जयस्वालने स्वत:सोबतच पीडित मुलीच्या आईला (सहआरोपी महिला) स्वत:सोबत पळवून नेल्याचा संशय असल्याने पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी ठिकठिकाणी प्रयत्न चालविले आहेत.आरोपी जयस्वालची एक शिक्षण संस्था असून तो बांधकाम कंत्राटदारीही करायचा. मध्यप्रदेशातील शिवनी येथील रहिवासी असलेल्या महिलेला आरोपी अशोक जयस्वालने स्वत:कडे कामाला ठेवून घेतले होते. महिला, तीची १५ आणि १७ वर्षांची मुलगी तसेच २० वर्षांचा मुलगा जयस्वालच्या शेतातील आउट हाऊसमध्येच राहत होते. महिलेच्या निराधारपणाचा गैरफायदा उचलून जयस्वालने तिच्या लहानसहान गरजा पूर्ण केल्या आणि तिच्या मुलीवर विखारी नजर टाकणे सुरू केले. संधी साधून नराधम जयस्वाल १७ वर्षीय मुलीला स्वत:कडे बोलवित होता. त्याने आॅक्टोबर २०१६ पासून तिचा लैंगिक छळ सुरू केला. महिलेच्या मदतीने त्याने तिला एकदा हैदराबादला नेले आणि तेथे तिला झोपेच्या गोळ्या खाऊ घालून तिच्यावर बलात्कार केला. तिला बदनामीचा तसेच मारण्याचा धाक दाखवून गप्प केले. मुलीने आपल्या आईला हा प्रकार सांगितला. मात्र, तिनेही गप्प राहण्याचा सल्ला दिल्याने निर्ढावलेला जयस्वाल वारंवार पीडित मुलीवर बलात्कार करू लागला. त्यानंतर त्याने आपली विकृत नजर पीडित मुलीच्या लहान बहिणीवर (वय १५) वळवली. तिला कार्यालयात बोलवून तो तिच्यासोबत अश्लिल चाळे करू लागला. हा प्रकार मुलीने एकाला सांगितला. त्याने मदत करण्याच्या नावाखाली तिला भंडाऱ्याला पळवून नेले. तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणात नंदनवन पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. संरक्षण समितीच्या सदस्यांकडून १० सप्टेंबरला मुलीची (वय १५)वास्तपूस्त करण्यात आली. तेव्हा तिने आरोपी जयस्वाल आपला नेहमी विनयभंग करतो आणि मोठ्या बहिणीवर बलात्कार करतो, असे सांगितले. त्यानंतर या संतापजनक प्रकरणाचा बोभाटा झाला. नंदनवन पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करताच आरोपी जयस्वाल फरार झाला.त्याने स्वत:सोबतच मुलीच्या आईलाही पळवून नेले. फरार राहून वकिलाच्या माध्यमातून तो न्यायालयातून अटकपूर्व जामिन मिळवण्याचा प्रयत्न करीत होता. सत्र न्या. आर. आर. पटारे यांच्यासमोर गुरुवारी या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. सरकारी वकिल आणि नंदनवन पोलिसांनी प्रकरणातील धक्कादायक बाबी ठेवून जयस्वालच्या जामिनाला विरोध केला. दोन्ही बाजू लक्षात घेत न्या. पटारे यांनी आरोपी जयस्वालचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळून लावला.तेलंगणा, मध्यप्रदेशात शोधाशोध !आरोपी जयस्वालने त्याला मदत करणारी पीडित मुलीची आई हिलासुद्धा पळवून नेले असावे, असा संशय आहे. गुन्हा दाखल झाल्याच्या काही वेळेनंतर महिलेचा मोबाईल जगनाडे चौकातून स्वीच्ड ऑफ झाला. तो अद्यापही बंद आहे. महिला अत्यंत गरिब आणि निरक्षर आहे. त्यामुळे तिला मोबाईल लोकेशनचे वगैरे ज्ञान नसावे आणि आरोपी जयस्वालने तिला सोबत नेऊन स्वत:च तिचा मोबाईल बंद करून ठेवला असावा, असा संशय आहे. पोलिसांनी महिलेच्या मुळगावी मध्यप्रदेशात जाऊन तिला शोधण्याचे प्रयत्न केले. मात्र, ती आढळली नाही. तो नेहमी हैदराबाद, मुंबईला जायचा. त्यामुळे तिला आरोपीने हैदराबाद किंवा मुंबईला पळवून नेले असावे, असा संशय आहे. तिकडेही पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Courtन्यायालयRapeबलात्कार