शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण संस्थेचा बलात्कारी संचालक फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:04 IST

निराधार महिलेला पैशाचे आमिष दाखवून तिच्या मदतीने तिच्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा एका शिक्षण संस्थेचा संचालक अशोक जयस्वाल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

ठळक मुद्देपीडित मुलीच्या आईलाही पळविल्याचा संशयअटकपूर्व जामिन मिळविण्याचा प्रयत्नपोलिसांची ठिकठिकाणी शोधाशोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निराधार महिलेला पैशाचे आमिष दाखवून तिच्या मदतीने तिच्या दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा एका शिक्षण संस्थेचा संचालक अशोक जयस्वाल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो फरार राहून अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याने पीडित मुलीच्या आरोपी आईलाही फरार केले आहे. या दोघांचा पोलीस ठिकठिकाणी शोध घेत आहेत.पीडित मुलगी (वय १७) मुळची शिवनी येथील रहिवासी आहे. तिची आई १३ वर्षांपासून आरोपी अशोक जयस्वालकडे काम करते आणि त्याच्या शेतातील आउट हाऊसमध्ये राहते. मुलीचे वडिल काही वर्षांपासून मध्यप्रदेशात मुळगावी राहतात. पीडित मुलीने १० पास केल्यानंतर तिच्या आईने तिला शिकवण्याऐवजी कामात गुंतवले. तिला आणखी एक बहिण (वय १५) आणि मोठा भाऊ (वय २०) आहे. आरोपी जयस्वालने महिलेच्या निराधारपणाचा गैरफायदा उचलून तिच्या लहानसहान गरजा पूर्ण केल्या. नराधम जयस्वालची नजर पीडित मुलीवर तीन वर्षांपूर्वी पडली. त्याने आॅक्टोबर २०१६ पासून तिला वारंवार जवळ बोलवणे सुरू केले. त्यानंतर तो तिला बाहेगावी घेऊन जाऊ लागला. तिच्या आईची संमती घेऊन त्याने तिला हैदराबाद तसेच मुंबईला नेले आणि तेथे तिला झोपेच्या गोळ्या खाऊ घालून बलात्कार केला. त्यानंतर तो नेहमीच पीडित मुलीवर बलात्कार करू लागला. तिच्या आईची मूक संमती असल्यामुळे नराधम जयस्वाल निर्ढावला होता. आपल्या मुलीच्या वयाच्या गरिब मुलीसोबत तो तोंड काळे करीत होता.दरम्यान, जून महिन्यात पीडित मुलीच्या लहान बहिणीला भंडाऱ्याच्या एका आरोपीने पळवून नेले. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीला भंडाºयावरून ताब्यात घेतले. पळवून नेलेल्या आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. त्यामुळे या प्रकरणात नंदनवन पोलिसांनी बलात्काराचा पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील पीडितेच्या बहिणीची चौकशी करण्यासाठी मंगळवारी एका स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी तिच्याकडे गेले होते. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केल्यामुळे नराधम जयस्वालच्या पापाचा खुलासा झाला. त्यानंतर प्रकरण नंदनवन ठाण्यात पोहचले.पीडित मुलीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी नराधम जयस्वाल आणि त्याला मदत करणारी मुलीची आई या दोघांवर गुन्हा दाखल केला. ते कळताच आरोपी जयस्वाल फरार झाला. त्याने स्वत: फरार होतानाच पीडित मुलीच्या आईलाही फरार केले. त्यानेच तिला पळवून नेले असावे, असा संशय आहे. तो आता अटकपूर्व जामिन मिळवण्याचे प्रयत्न करीत आहे. तर, त्याचा आणि महिला आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके मध्यप्रदेशसह ठिकठिकाणी शोध घेत आहेत.समाजमन संतप्त !आरोपी जयस्वाल स्वामी नारायण मंदीराजवळ राहतो. त्याची शिक्षण संस्था असून, तो काही कत्राटदारीही करतो. स्वनामधन्य नेता म्हणूनही तो मिरवतो. तो यापूर्वी सामाजिक संघटनेचा अध्यक्षही होता. आपले पाप घरच्यांना माहिती पडू नये म्हणून त्याने पीडित मुलीचे कुटुंबं शेतातील आउट हाऊसमध्ये ठेवले होते. पीडित मुलीला त्याने हैदराबादला झोपेची गोळी देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिला मुंबईला नेले होते. तिचे शोषण चालविल्यानंतर त्याची विकृत नजर मुलीच्या लहान बहिणीवर (वय १५) गेली. तो तिला कार्यालयात कुणी बोलावून घ्यायचा अन् तेथे तिच्याशी अश्लिल चाळे करायचा. त्याने पीडितेच्या आईला आणि नंतर दोन्ही मुलींना बाहेर वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. जयस्वालच्या पापाचा बोभाटा झाल्यामुळे समाजमन संतप्त झाले आहे. त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे. दरम्यान, त्याला लवकरच अटक करू, असा विश्वास नंदनवनचे ठाणेदार विनायक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार