शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

नागपूर जिल्ह्याला पुन्हा वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 10:49 AM

नागपूर जिल्ह्याला शनिवारी मध्यरात्री वादळाचा पुन्हा तडाखा बसला. यात रामटेक तालुक्यातील शिवनी (भोंडकी) शिवारात गारपीट झाली तर मौदा तालुक्यात कोदामेंढी येथे घराची पडझड झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देशिवनी शिवारात गारा पडल्या गहू, हरभरा पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्याला शनिवारी मध्यरात्री वादळाचा पुन्हा तडाखा बसला. यात रामटेक तालुक्यातील शिवनी (भोंडकी) शिवारात गारपीट झाली तर मौदा तालुक्यात कोदामेंढी येथे घराची पडझड झाल्याची माहिती आहे. अवकाळी पाऊन आणि गारपीट यामुळे या परिसरातील गहू आणि हरभऱ्याच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.रामटेक तालुक्यात धानाच्या पिकाची कापणी केल्यानंतर बहुतांश शेतकरी गहू आणि हरभऱ्याची पेरणी करतात. तालुक्यात चालू हंगामात चार हजार हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी केली आहे. सध्या या गव्हाच्या लोंब्या पक्व होण्याची प्रक्रिया सुरू असून, काही शेतांमधील गव्हाचे पीक कापणीला आले आहे. त्यातच शनिवारी मध्यरात्री रामटेक तालुक्यातील महादुला, शिवनी, किरणापूर, भंडारबोडी परिसरात जोरदार वादळासह अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या तर काही शिवारात गारपीट झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.विशेष म्हणजे, या पावसासंदर्भात हवामान खात्याने कोणताही अंदाज व्यक्त केला नव्हता. त्यामुळे अचानक कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. वादळी पावसामुळे महादुला (ता. रामटेक) येथील सोमा डडुरे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील कापणीला आलेले गव्हाचे पीक लोळले आहे. दुसरीकडे, शिवनी व किरणापूर शिवारात गारपीट झाल्याची माहिती शिवनी येथील माजी उपसरपंच हेमराज बडवाईक यांनी दिली. यासंदर्भात मुसेवाडी कार्यालयातील मंडळ कृषी अधिकारी पटले यांनी सांगितले की, अचानक कोसळलेल्या अवकाळी पावसाच्या या सरींमुळे गव्हाच्या पिकाचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याच्या सूचना कृषी सहायकांना दिल्या आहेत. त्यांचा पाहणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो शासनाकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर शासनाच्या आदेशान्वये पुढील कार्यवाही केली जाईल, असेही पटले यांनी स्पष्ट केले. कोदामेंढी परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस व वादळाने झोडपून काढले.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस