बजाजनगरात तरुणीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST2021-06-20T04:07:08+5:302021-06-20T04:07:08+5:30

नागपूर - तू माझ्याशी बोलत का नाही, असा प्रश्न करून एका आरोपीने बजाजनगरातील तरुणीचा विनयभंग केला. राजेश मोहन वर्मा ...

Rape of a young woman in Bajajnagar | बजाजनगरात तरुणीचा विनयभंग

बजाजनगरात तरुणीचा विनयभंग

नागपूर - तू माझ्याशी बोलत का नाही, असा प्रश्न करून एका आरोपीने बजाजनगरातील तरुणीचा विनयभंग केला. राजेश मोहन वर्मा (वय २३) असे आरोपीचे नाव आहे.

तो आणि तक्रार करणारी तरुणी (वय१९) एकाच वाॅर्डात राहतात. आरोपी वर्मा तिला अनेक दिवसांपासून इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करीत आहे. ती भाव देत नसल्याने तो तिचा पाठलाग करतो. शुक्रवारी दुपारी ४.१५ वाजता ती बजाजनगरातून येताना दिसताच त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने तिच्या पाठीमागून येऊन तू माझ्याशी बोलत का नाही, असा प्रश्न करत तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. तिने दिलेल्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

---

Web Title: Rape of a young woman in Bajajnagar