नागपुरात त्रिपुरातील महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:59 AM2018-12-02T00:59:30+5:302018-12-02T01:00:53+5:30

पोलीस स्टेशन दाखवतो, असे सांगून एका आरोपीने त्रिपुरा येथून नागपुरात आलेल्या महिलेला रेल्वेस्थानकाजवळच्या झुडपात नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Rape on women in Tripura in Nagpur | नागपुरात त्रिपुरातील महिलेवर अत्याचार

नागपुरात त्रिपुरातील महिलेवर अत्याचार

Next
ठळक मुद्देपोलीस ठाणे दाखवण्याची बतावणी : झुडपात नेऊन केला बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस स्टेशन दाखवतो, असे सांगून एका आरोपीने त्रिपुरा येथून नागपुरात आलेल्या महिलेला रेल्वेस्थानकाजवळच्या झुडपात नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.
मूळची त्रिपुरा येथील रहिवासी असलेली ३० वर्षीय महिला कोईम्बतूर येथे नोकरी करते. ती तिच्या सागर आणि ज्योती नामक मैत्रिणीसह गुरुवारी मध्यरात्री नागपुरात आली. ते दोघे इंदोरला असतात. सागर आणि ज्योतीने पीडित महिलेला रेल्वेस्थानकावर सोडून ते त्यांच्या गावाला निघून गेले. मध्यरात्री १ वाजता महिलेला कोणते काम पडले कळायला मार्ग नाही. तिने तेथे बसलेल्या एका ४० ते ४५ वयोगटातील व्यक्तीला पोलीस ठाण्याचा पत्ता विचारला. त्याने तिला पोलीस ठाणे दाखवतो, असे म्हणून रेल्वेस्थानकाबाहेर आणले आणि बाजूच्या झुडपात नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार केला. त्यानंतर काही वेळाने आरोपीने तिला बाजूच्या एका लॉजमध्ये नेऊन पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडित महिलेला सोडून दिले. ती रेल्वेस्थानकाजवळच्या मेट्रोच्या बूथजवळ संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचे पाहून मेट्रोच्या गार्डने तिला वाहतूक शाखेच्या पोलीस कार्यालयाजवळ आणले. तिने तेथे आपबिती सांगितल्यानंतर तेथून त्यांनी गणेशपेठ ठाण्यात फोन करून बलात्काराची माहिती दिली. त्यानंतर गणेशपेठच्या पोलीस पथकाने तिला शुक्रवारी पहाटे ठाण्यात आणले. एका आरोपीने पोलीस ठाण्याचा पत्ता सांगतो, असे म्हणून एकदा झुडपात तर दुसऱ्यांदा लॉजवर बलात्कार केल्याचे सांगताच पोलीस हादरले. त्यांनी वैद्यकीय तपासणी आणि अन्य औपचारिकता पार पाडल्यानंतर गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल होण्यास विलंब
पीडित महिलेचा पती लष्करात असल्याचे सांगितले जाते. तिला भाषेची समस्या असल्याने पोलिसांना आरोपी आणि घटनाक्रम समजून घेण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. त्यामुळे घटनेच्या २४ तासानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला.
आरोपी सीसीटीव्हीत कैद
या प्रकरणातील आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तो महिलेला सोबत नेताना दिसतो आहे. त्या आधारे गणेशपेठ पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, ती पोलीस ठाण्यात कशासाठी जात होती, ते स्पष्ट झाले नाही.

Web Title: Rape on women in Tripura in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.