नागपुरातील सक्करदरा भागात चाकुच्या धाकावर महिलेवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:42 IST2018-01-24T00:41:30+5:302018-01-24T00:42:15+5:30
सात वर्षांपासून सतत मारहाण करीत एका महिलेवर (वय २४) बलात्कार करणाऱ्या सनी गजभिये (वय ३०, रा. भांडेवाडी) नामक आरोपीविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

नागपुरातील सक्करदरा भागात चाकुच्या धाकावर महिलेवर बलात्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सात वर्षांपासून सतत मारहाण करीत एका महिलेवर (वय २४) बलात्कार करणाऱ्या सनी गजभिये (वय ३०, रा. भांडेवाडी) नामक आरोपीविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
संबंधित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी सक्करदरा भागातील भांडेप्लॉट येथे राहतो. त्याची वस्तीतीलच संबंधित महिलेसोबत २०११ मध्ये ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. तेव्हापासून त्यांच्यात वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित होऊ लागले. सदर महिलेने सोमवारी सक्करदरा ठाण्यात तक्रार नोंदवली. सनी तिला चाकूचा धाक दाखवून सतत मारहाण करायचा आणि तिच्यावर बलात्कार करायचा. या तक्रारीनुसार, सक्करदरा पोलिसांनी आरोपी सनी गजभियेविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.