शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

बलात्कार पीडितेचे छायाचित्र केले व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 22:23 IST

सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचे दवाखान्यातील छायाचित्र काढून ते व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल केल्याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देउमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलराष्ट्रवादीच्या दोन महिलांचा बेजबाबदारपणा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेचे दवाखान्यातील छायाचित्र काढून ते व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरल केल्याप्रकरणी उमरेड पोलीस ठाण्यात दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आश्चर्यकारक बाब ही की, सदर दोन्ही आरोपी महिला नागपूर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महत्त्वपूर्ण पदावर आहेत. यापैकी एका महिलेकडे नागपूर येथे पक्षाच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष पदाचा कार्यभार आहे. दुसऱ्या महिलेकडे महासचिवपद आहे. अलका कांबळे आणि उर्वशी गिरडकर अशी त्यांची नावे आहेत. एका राष्ट्रीय पक्षामधील नेत्यांच्या असल्या बेजबाबदारपणाचा संताप सर्वत्र व्यक्त होत आहे.यापूर्वीही या पीडितेची काही छायाचित्रे व्हायरल झाल्याने कुटुंबीय, नातेवाईक आणि मैत्रिणीं अस्वस्थ झालेत. याप्रकरणी दोन्ही आरोपी महिलांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांनी दिली.काही दिवसांपूर्वी आरोपी महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका नेत्यासोबत नागपूरच्या खासगी रुग्णालयात पीडितेला हिंमत देण्यासाठी गेल्या. दवाखान्यात बेशुद्धावस्थेत असलेल्या पीडित महिलेचे छायाचित्र काढले. व्हॉटस्अ‍ॅपवर व्हायरलसुद्धा केले. दिल्ली येथील निर्भया बलात्कार प्रकरणानंतर २२८ (अ) ही नवीन कलम अमलात आली.नव्यानेच कायदा करण्यात आला. बलात्कार प्रकरणात पीडितेची ओळख उघड करणे हा गुन्हा असल्याचा नवा कायदा अस्तित्वात आलेला आहे. अशा स्वरूपाच्या गुन्ह्याची नागपूर जिल्ह्यात बहुधा पहिलीच नोंद असावी, असे बोलले जात आहे. उमरेड पोलिसांनी याप्रकरणी २२८ (अ) कलमान्वये दिनांक २० आॅगस्ट रोजी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश हाके करीत आहेत.यू ट्युबवर व्हिडीओपीडितेच्या आईची मुलाखत असलेला आणखी एक व्हिडीओ यू ट्युबवर अपलोड करण्यात आला आहे. ९ मिनिट २ सेकंदाच्या या व्हिडीओत पीडितेच्या आईने आपला संताप आणि वेदनांना वाट मोकळी करून दिली. अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्यरीत्या वठविली नाही. वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावे. अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केलेली आहे.या मुलाखतीत वैद्यकीय अहवाल मिळाला नसल्याचा संताप आणि पोलीस विभागावरही आरोप केला आहे. माझ्या मुलीस न्याय हवा. त्याला फाशी झाली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यामध्ये केले आहे. मन हेलावून टाकणाऱ्या या व्हिडीओमध्ये आरोपींची संख्या अधिक असण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. माझी मुलगी बरी झाल्यानंतर तिला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी हिंमत देणार असल्याचाही विश्वास आईने व्यक्त केला आहे.पोलीस कोठडी २२ पर्यंतयाप्रकरणी मामलेश कन्हैय्यालाल चक्रवर्ती (२०) आणि संतोष मांगीलाल माळी (४०) दोघेही रा. मध्यप्रदेश, देवास यांना अटक केल्या गेली. त्यानंतर न्यायालयाने दोघांनाही २२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. उद्या पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर केल्या जाणार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा तावरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.थातूरमातूर कारवाईवेकोलिमध्ये कार्यरत महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार होऊनही वेकोली प्रशासन अद्याप कुंभकर्णी झोपेतच असल्याचा संताप व्यक्त होत आहे. वेकोलि प्रशासनाने आतापर्यंत केवळ दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. सोबतच सहा जणांना केवळ कारणे दाखवा नोटीस बजावली तर एका बड्या महिला अधिकाऱ्याची नागपूर मुख्यालयात बदली केलेली आहे. मुख्यालयी केलेली ही बदली म्हणजे शिक्षा की बक्षीस असाही आरोप आता होत आहे. वेकोलि मुख्य कार्यालयाचे सीएमडी चित्तरंजन मिश्रा, उमरेड वेकोलि क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक एम. के. मजुमदार यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी पीडितेच्या कुटुंबियांनी केली आहे. गोकुळ खाणचे प्रबंधक जी. एस. राव यांनाही तडकाफडकी बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणीही होत आहे. थातूरमातूर कारवाईने परिसरात संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कार