नागपुरात बड्या हॉटेलमालकाने केला तरुणीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:52 IST2017-11-21T00:50:35+5:302017-11-21T00:52:17+5:30

Rape victim raped by big hotel in Nagpur | नागपुरात बड्या हॉटेलमालकाने केला तरुणीवर बलात्कार

नागपुरात बड्या हॉटेलमालकाने केला तरुणीवर बलात्कार

ठळक मुद्देदोन वर्षे पत्नीसारखे डुप्लेक्समध्ये ठेवलेलग्नास नकार देताच तरुणीने घेतला पोलिसांचा आधार








आॅनलाईन लोकमत

नागपूर : मुलीच्या वयाच्या तरुणीला दोन वर्षे एका डुप्लेक्समध्ये ठेवून तिच्यासोबत पत्नीसारखे संबंध ठेवणाºया आणि आता तिला हाकलून लावण्याचा प्रयत्न करणाºया एका बड्या हॉटेल व्यावसायिकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
एलविन गोम्स जोये डी गोम्स (वय ५१) असे आरोपीचे नाव आहे. शंकरनगर चौक ते अंबाझरी मार्गावर गोम्सचे एक आलिशान हॉटेल आहे. तो हिंगणा मार्गावर राहतो. पीडित तरुणी (वय २५) या हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट होती. गोम्स तिच्यावर भाळला होता. त्याने आधी तिला तीन वर्षांपूर्वी प्रपोज केले. तो वडिलांच्या वयाचा असल्यामुळे तिने त्याला स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे गोम्सने त्यावेळी तिला चांगले मित्र बनू असे म्हणत तिच्यासोबत मैत्री जोडली. हॉटेलशी संबंधित कामाच्या निमित्ताने तिच्यावर वेगवेगळ्या जबाबदाºया सोपवून तो तिला इकडेतिकडे नेऊ लागला. ती उत्तर नागपुरात राहते, तिला येण्या-जाण्यासाठी पायपीट करावी लागते म्हणून तो स्वत:च आलिशान कारमधून तिला घेऊन यायचा आणि नेऊन सोडायचा. अशाप्रकारे तिचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याने एमआयडीसीतील राजीव गांधीनगरातील राधाकृष्णनगरीत एक डुप्लेक्स घेतला. मी तुझ्याशी लग्न करतो, असे म्हणत त्याने तिला तेथे ठेवले. जानेवारी २०१५ मध्ये तिच्यासोबत पहिल्यांदा शरीरसंबंध जोडले. तेव्हापासून आॅगस्ट २०१७ पर्यंत तो तिचा पत्नीसारखा उपभोग घेऊ लागला.
---
हाकलून लावण्याचा प्रयत्न
तीन महिन्यांपासून तिने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला असता, त्याने तिला लग्नास नकार दिला. एवढेच नव्हे तर तिला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले आणि हाकलूनही लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गोम्सविरुद्ध बलात्कार तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
---

Web Title: Rape victim raped by big hotel in Nagpur