शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेवर अत्याचार, नागपुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 11:34 AM

२५ वर्षीय युवकाने विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केले. महिलेने निखिलला कोर्ट मॅरेज करण्यासाठी दबाव टाकला; परंतु आरोपीने लग्नास नकार दिला.

नागपूर : सदर परिसरात एका ३५ वर्षांच्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन सदर पोलिसांनी आपोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. निखिल सुप्रबुद्ध शेंडे (२५) असे आरोपीचे नाव आहे. 

पीडित महिलेच्या पतीचे २०१४ मध्ये निधन झाले. ती सध्या आपल्या मुलीसोबत राहते. निखिलची मे २०२१ मध्ये महिलेशी ओळख झाली. ती मुलीसोबत एकटी राहत असल्याचे कळल्यानंतर त्याने मैत्री वाढवण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याचे या ना त्या बहाण्याने घरी येणे-जाणे सुरू झाले. त्यानंतर त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

ऑगस्टमध्ये महिलेने निखिलला कोर्ट मॅरेज करण्यासाठी दबाव टाकला; परंतु आरोपीने लग्नास नकार दिला. आरोपीने पीडित महिलेच्या मुलीला बदनाम करण्याची धमकी दिली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासह इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी