लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेवर अत्याचार, नागपुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 13:04 IST2021-10-10T11:34:36+5:302021-10-10T13:04:46+5:30
२५ वर्षीय युवकाने विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केले. महिलेने निखिलला कोर्ट मॅरेज करण्यासाठी दबाव टाकला; परंतु आरोपीने लग्नास नकार दिला.

लग्नाचे आमिष दाखवून विधवा महिलेवर अत्याचार, नागपुरातील घटना
नागपूर : सदर परिसरात एका ३५ वर्षांच्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन सदर पोलिसांनी आपोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. निखिल सुप्रबुद्ध शेंडे (२५) असे आरोपीचे नाव आहे.
पीडित महिलेच्या पतीचे २०१४ मध्ये निधन झाले. ती सध्या आपल्या मुलीसोबत राहते. निखिलची मे २०२१ मध्ये महिलेशी ओळख झाली. ती मुलीसोबत एकटी राहत असल्याचे कळल्यानंतर त्याने मैत्री वाढवण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याचे या ना त्या बहाण्याने घरी येणे-जाणे सुरू झाले. त्यानंतर त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
ऑगस्टमध्ये महिलेने निखिलला कोर्ट मॅरेज करण्यासाठी दबाव टाकला; परंतु आरोपीने लग्नास नकार दिला. आरोपीने पीडित महिलेच्या मुलीला बदनाम करण्याची धमकी दिली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासह इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.