लग्नाचे वचन देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:09 IST2021-04-01T04:09:03+5:302021-04-01T04:09:03+5:30
नागपूर : डेअरीत काम करणाऱ्या तरुणाने लग्नाचे वचन देऊन एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. ही घटना नंदनवन पोलिसांच्या हद्दीत ...

लग्नाचे वचन देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार
नागपूर : डेअरीत काम करणाऱ्या तरुणाने लग्नाचे वचन देऊन एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. ही घटना नंदनवन पोलिसांच्या हद्दीत घडली. पाेलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
धीरज धनराज बावणे (२१) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. पीडित मुलगी १७ वर्षे वयाची आहे. आरोपी व पीडित मुलीची वर्षभरापूर्वी एकमेकांसोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये मैत्री झाली व काही दिवसांनी मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आरोपीने मुलीला लग्न करण्याचे वचन दिले. त्यामुळे मुलगी आरोपीच्या अधिक जवळ गेली. आरोपी हा मुलीला सोबत घेऊन बाहेर फिरायला लागला. दरम्यान, त्याने मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आरोपी हा मुलीला टाळायला लागला. तो तिच्यासोबत बोलत नव्हता. लग्नाचा विषय काढल्यानंतर तो चिडत होता. आरोपीने फसवणूक केल्याचे कळल्यामुळे मुलीने नंदनवन पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवली.