फेसबुक फ्रेंडचा बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:07 IST2021-05-16T04:07:23+5:302021-05-16T04:07:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फेसबुकवरून ओळखी आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाल्याने ते दोघे शरीरसंबंध प्रस्थापित करू लागले. दोन ...

Rape of a Facebook friend | फेसबुक फ्रेंडचा बलात्कार

फेसबुक फ्रेंडचा बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : फेसबुकवरून ओळखी आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाल्याने ते दोघे शरीरसंबंध प्रस्थापित करू लागले. दोन वर्षांच्या संबंधांनंतर आता त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे तिने पोलिसांकडे धाव घेऊन प्रियकराविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली.

सूरज लक्ष्मणराव मडावी (वय ३१) असे आरोपीचे नाव असून अजनी पोलिसांनी त्याला शुक्रवारी रात्री अटक केली. सूरज अर्जुननगर नागपूर येथे राहतो. सूरज आणि २७ वर्षीय तरुणीची ऑगस्ट २०१९ मध्ये फेसबुकवर ओळख झाली होती. सूरज होमगार्ड असून तरुणी एका खासगी इस्पितळात टेक्निशियन आहे. या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. आरोपी सूरज मडावीच्या मित्राची अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूम आहे. तेथे हे दोघे नेहमी शरीरसंबंध प्रस्थापित करीत होते. मार्च २०२१ पर्यंत त्यांचे सुरळीत सुरू होते. त्यानंतर मात्र बिनसले. तिने लग्नासाठी तगादा लावला. त्यामुळे सूरजने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे या दोघांमध्ये खटके उडू लागले. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी तरुणीने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. लग्नाचे आमिष दाखवून सूरजने बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद केले. ठाणेदार विनोद चौधरी यांनी चौकशी करून आरोपी सूरज मडावीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्याला रात्री अटक करण्यात आली.

---

Web Title: Rape of a Facebook friend