नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून दोघींवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:04 IST2019-04-19T23:03:57+5:302019-04-19T23:04:32+5:30

लग्नाचे आमिष दाखवून दोघींवर बलात्कार केल्याचा प्रकार जरीपटका व मानकापूर पोलीस ठाणे परिसरात उघडकीस आला.

Rape on both of them by showing lure of marriage in Nagpur | नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून दोघींवर अत्याचार

नागपुरात लग्नाचे आमिष दाखवून दोघींवर अत्याचार

ठळक मुद्देजरीपटका व मानकापूर परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून दोघींवर बलात्कार केल्याचा प्रकार जरीपटका व मानकापूर पोलीस ठाणे परिसरात उघडकीस आला.
पहिली घटना मानकापूर पोलीस ठाणे हद्दीतील आहे. तीन वर्षांपूर्वी १ एप्रिल २०१६ रोजी मानकापूर येथील रहिवासी असलेल्या ३४ वर्षीय महिलेची ओळख आरोपी संदीप सिंग गुरुतेजसिंग भाटी (३२) रा. नारी रोड गुरुतेगबहादूरनगर याच्याशी झाली. यानंतर दोघांमध्ये सुरुवातीला मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. संदीप सिंग महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करू लागला. दरम्यान महिलेला ब्लॅकमेल करून तिच्याकडून ३५ हजार रुपये घेतले. १५ मार्च २०१९ पर्यंत त्याने महिलेवर बलात्कार केला. महिलेच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३२८, ३७६, ३७७ व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. दुसरी घटना जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत घडली. जरीपटका येथील ३४ वर्षीय महिलेचे हिलटॉप सोसायटी दाभा येथील आरोपी चंद्रकांत बाळाराम घोडेस्वार (३६) याच्याशी प्रेमसंबंध होते. चंद्रकांतने २० सप्टेंबर २०१८ च्या रात्री ८.३० वाजता महिलेला लग्नाचे आमीष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून २५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत हा प्रकार सुरू होता. नंतर लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title: Rape on both of them by showing lure of marriage in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.