युवतीवर दोघांचा बलात्कार
By Admin | Updated: October 9, 2015 02:49 IST2015-10-09T02:49:32+5:302015-10-09T02:49:32+5:30
दोघांनी एका युवतीवर वारंवार बलात्कार केला. तर आरोपींच्या दोन साथीदारांनी पीडित युवतीला या प्रकाराची वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,....

युवतीवर दोघांचा बलात्कार
आरोपीच्या साथीदारांची धमकी : चौघांविरुद्ध गुन्हे दाखल
नागपूर : दोघांनी एका युवतीवर वारंवार बलात्कार केला. तर आरोपींच्या दोन साथीदारांनी पीडित युवतीला या प्रकाराची वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या आठवड्यात ही घटना घडली. अमित सागर ओझा (वय २२, रा. पलोटीनगर, मानकापूर) आणि बिरजू (वय २५, रा. इंदोरा) अशी बलात्कार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
गिट्टीखदानमधील युवती (वय १८) आरोपी अमितची मैत्रीण आहे. ३० सप्टेंबरला सायंकाळी अमितने तिला फिरण्याच्या निमित्ताने बाहेर नेले. उशिरा रात्रीपर्यंत इकडे तिकडे फिरवल्यानंतर मध्यरात्री अमितने तिला इंदोऱ्यातील बिरजूच्या रूमवर नेले. तेथे त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ते पाहून आरोपी बिरजूनेही शरीरसंबंधाची मागणी केली. युवतीने नकार देताच त्याने तिला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर १ आॅक्टोबरला पहाटे २ वाजता आरोपी अमितने पुन्हा तिला आपल्या रूममवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दुस-या दिवशीसुद्धा आरोपीने असाच प्रकार केला.
या प्रकाराने संतप्त झालेल्या पीडित युवतीने आरोपीसोबत मित्रता तोडली. त्यामुळे ती पोलिसांकडे तक्रार करू शकते, अशी भीती आरोपींना वाटली. तिने पोलिसांकडे जाऊ नये म्हणून आरोपीची साथीदार सुप्रिया ऊर्फ नेहा (वय २३) आणि प्रिन्स यादव (वय २५) या दोघांनी तिला या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारू, अशी धमकी दिली. धोका लक्षात घेऊन पीडित युवतीने गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवली.
एपीआय आर.डी. बावनकर यांनी सामूहिक बलात्कार तसेच धमकी देण्याच्या आरोपाखाली उपरोक्त चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
नंदनवनमध्येही बलात्कार
नंदनवनमध्येही बलात्काराची घटना उघडकीस आली. आरोपी गजानन ताजने (वय ३२) याने घरासमोर राहणाऱ्या १० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून मंगळवारी रात्री ७.१५ च्या सुमारास आपल्या रुममध्ये नेले आणि तिच्यावर पाशवी अत्याचार केला. ही संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी ताजनेविरुद्ध गुन्हा दाखल केला.