शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

नागपुरात फोनवरून धमकी देऊन मागितली सुपारीवाल्याला खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 00:52 IST

सुपारीवाल्याला फोनवरून खंडणी मागणाऱ्या आणि न दिल्यास ‘तेरी सुपारी लुंगा’ अशी धमकी देणाऱ्या आरोपींविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देलकडगंजमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुपारीवाल्याला फोनवरून खंडणी मागणाऱ्या आणि न दिल्यास ‘तेरी सुपारी लुंगा’ अशी धमकी देणाऱ्या आरोपींविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला.राजेश किशनचंद घई (वय ४२) हे क्वेट्टा कॉलनी लकडगंजमध्ये राहतात. लकडगंजमधील आॅक्ट्रॉय झोनमध्ये त्यांचे गोदाम आहे. भंडारा मार्गावरील राधाकृष्ण कमोडिटी ट्रेडर्स नावाने ते सुपारीवर प्रक्रिया करण्याचा व्यवसाय करतात. आरोपी एकनाथ फलके (वय ३०, रा. पारडी, कळमना) आणि त्याच्या तीन साथीदारांनी बुधवारी दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी राजेश घर्इंना फोन केला. आरोपींनी त्यांना तुला सुपारीचा धंदा करायचा असेल तर आज ३० हजार रुपये आणि पुढे दरमहा २५ हजार रुपये खंडणी द्यावी लागेल. खंडणी दिली नाही तर तुला पाहून घेऊ, अशी धमकी आरोपींनी दिली. आरोपींची एकूणच पार्श्वभूमी लक्षात घेता भविष्यात आरोपींचा उपद्रव वाढू शकतो, हे ध्यानात आल्याने घई यांनी लकडगंज ठाण्यात बुधवारी सायंकाळी तक्रार नोंदवली. पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर रात्री या प्रकरणात गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.विशेष म्हणजे, जरीपटका, लकडगंज, नंदनवन, कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सडक्या सुपारीचा गोरखधंदा करणारे अनेक जण आहेत. या सडक्या सुपारीवर सल्फरची प्रक्रिया करून आरोपी त्या काळ्याकुट्ट आणि आरोग्यास अपायकारक असलेल्या सुपारीला पांढरी बनवितात. ही सुपारी नागपुरातील पानटपरीवर खर्रा घोटणाºयांना विकली जाते. शिवाय नागपूर-महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्येही ही आरोग्याला घातक असलेली सुपारी पाठविली जाते. लोकमतने यासंबंधाने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. सडक्या सुपारीचा हा विषय दोन वर्षांपूर्वी विधिमंडळाच्या अधिवेशनातही चर्चेला आला होता. संबंधित अधिकारी एखादवेळी कारवाई करून गप्प बसतात.अनेकांचे पाठबळसडक्या सुपारीच्या गोरखधंद्याला अनेकांचे पाठबळ आहे. पोलीस आणि अन्न व औषध तसेच पुरवठा विभागाचे काही भ्रष्ट अधिकारी जीवाचा खेळ करणाºया व्यापाºयांकडून लाचेच्या रूपात महिन्याला लाखो रुपये घेतात. अनेक गुंडही या गोरखधंदेवाल्यांकडून महिन्याला लाखोंचा प्रोटेक्शन मनी घेतात. स्वत:ला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारी मंडळी सुपारीवाल्यांकडून खंडणी वसुलतात. काहीं जणांनी तक्रारी ओरड करून या गोरखधंद्यात आता चक्क भागीदारी सुरू केली आहे. या धंद्यातील मास्टर मानला जाणाºया नितीनने आता स्वत:च हा जोडधंदा सुरू केला आहे. खंडणी दिली नाही की पोलीस, एफडीआयकडे तक्रारी करतात. सध्या शैलू, अक्षय, शरद ही नावे या गोरखधंद्यात खंडणी वसुलीसाठी चर्चेत आहेत. पोलिसांनी या खंडणीबाजांवर तसेच लाखों लोकांना कॅन्सरसारखा रोग देणाºया सडक्या सुपारीचा धंदा करणाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा