रामझुल्याचा विस्तारित भाग किंग्जवे उड्डाणपूल ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:08 IST2021-01-02T04:08:11+5:302021-01-02T04:08:11+5:30
नागपूर : किंग्जवे येथे निर्माणाधीन उड्डाणपूल हा वास्तवात रामझुल्याचा विस्तारित भाग आहे. वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी उड्डाणपुलाचे बांधकाम वर्ष ...

रामझुल्याचा विस्तारित भाग किंग्जवे उड्डाणपूल ()
नागपूर : किंग्जवे येथे निर्माणाधीन उड्डाणपूल हा वास्तवात रामझुल्याचा विस्तारित भाग आहे. वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी उड्डाणपुलाचे बांधकाम वर्ष २०२१ मध्ये पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. उड्डाणपूल किंग्जवेवरून रिझर्व्ह बँक चौकाच्या २०० मीटरपूर्वी उतरेल तर दुसरा भाग कॉन्व्हेंट स्कूलकडे उतरणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनच्या (व्हीटीए) प्रतिनिधीमंडळाला दिली.
व्हीटीएच्या पदाधिकाऱ्यांनी पायाभूत सुविधांच्या विकास मुद्यांवर दीक्षित यांची भेट घेतली. यावेळी मुख्य रेल्वेस्थानकासमोरील प्रस्तावित नवीन उड्डाणपुलावर चर्चा झाली.
दीक्षित म्हणाले, उड्डाणपुलाखालील १६० दुकानांना स्थलांतरित न केल्याने टेकडी उड्डाणपूल तोडण्याचे काम थांबले आहे. हे कार्य मनपाला करायचे आहे. पर्यायी दुकाने तयार आहेत. पुनर्वसनाचे काम सुरू होताच तोडण्याचे काम आणि सहापदरी रस्त्याचे कामही सुरू करण्यात येईल. वाहतूक आणि सौंदर्यीकरणासाठी हे काम आवश्यक आहे. प्रतिनिधीमंडळात व्हीटीएचे उपाध्यक्ष हेमंत त्रिवेदी, सचिव तेजिंदरसिंग रेणू आणि सहसचिव राजेश कानुनगो उपस्थित होते.