रामटेक न. प.ने वसूल केला १.२० लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:09 IST2021-05-25T04:09:24+5:302021-05-25T04:09:24+5:30
रामटेक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातही निर्बंध लावण्यात आलेले आहे. मात्र याचे पालन होत नसल्याने प्रशासनाने नियम मोडणाऱ्यांवर ...

रामटेक न. प.ने वसूल केला १.२० लाखांचा दंड
रामटेक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातही निर्बंध लावण्यात आलेले आहे. मात्र याचे पालन होत नसल्याने प्रशासनाने नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यानुसार रामटेक नगर परिषदेच्या वतीने शहरात विनाकारण फिरणाऱ्या ४०० हून अधिक लोकांवर कारवाई करीत १ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. गत तीन महिन्यात न.प. प्रशासनाच्या पथकाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. लॉकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २० दुकानदारांविरुद्धही कारवाई करण्यात आली. ही कारवाई तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी अर्चना वंजारी व वर्तमान मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. कारवाई पथकात नगरपरिषद अधिकारी राजेश सव्वालाखे , वसुली अधिकारी गोविंद तुपट, विजय पडोळे, शशिकांत मेश्राम, राकेश खिचर, दीपक आकरे, मनीष वंजारी, मनोज चिंटोले आदींचा समावेश होता. लॉकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरुच राहील, असे मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी सांगितले. यासोबतच शहरातील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करावे असे आवाहन त्यांनी केले.