रामटेक, कामठीतही काेराेना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:08 IST2021-04-05T04:08:47+5:302021-04-05T04:08:47+5:30

रामटेक तालुक्यात ६३ रुग्ण आढळून आले असून, यात शहरातील २३ तर ग्रामीण भागातील ३१ रुग्ण आहेत. यात टिळक वाॅर्डातील ...

Ramtek, Kareena patient in Kamathi too | रामटेक, कामठीतही काेराेना रुग्ण

रामटेक, कामठीतही काेराेना रुग्ण

रामटेक तालुक्यात ६३ रुग्ण आढळून आले असून, यात शहरातील २३ तर ग्रामीण भागातील ३१ रुग्ण आहेत. यात टिळक वाॅर्डातील आठ, भगतसिंग वाॅर्डातील सात, महात्मा फुले वाॅर्डातील चार, आझाद वाॅर्डातील तीन, अंबाळा वाॅर्ड, विनोबा भावे वाॅर्ड व शास्त्री वाॅर्डातील प्रत्येकी दाेन, आंबेडकर वाॅर्ड, गांधी वाॅर्ड, नेहरू वाॅर्ड व राधाकृष्ण वाॅर्डमधील प्रत्येकी एक, तालुक्यातील पंचाळा येथील १६, परसोडा येथील सहा, बोरी येथील चार, चिचाळा, नगरधन, हिवराबाजार, काचूरवाही, महादुला व मनसर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

कामठी तालुक्यात ५५ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात कामठी शहरातील ३८ आणि तालुक्यातील शिरपूर येथील ११ तर येरखेडा येथील सहा रुग्ण आहेत. उमरेड तालुक्यात रविवारी ४७ रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात उमरेड शहरातील ३०, तर तालुक्यातील विविध गावांमधील १७ नवीन रुग्ण आहेत.

Web Title: Ramtek, Kareena patient in Kamathi too