Rakhi made by children from Nagalwadi left for police Naxalite area | नागलवाडी येथील मुलांनी बनविलेल्या राख्या नक्षलग्रस्त भागातील पोलिसांकडे रवाना 
नागलवाडी येथील मुलांनी बनविलेल्या राख्या नक्षलग्रस्त भागातील पोलिसांकडे रवाना 

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : नागलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांनी बनविलेल्या राख्या गडचिरोली येथील अतिशय दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांकडे रवाना करण्यात आल्या.
युवा चेतना मंचच्या कार्यकर्त्यांच्या सहयोगाने मुलांनी या राख्यांची निर्मिती केली आहे. मुलांमध्ये देशभक्तीची भावना प्रज्वलित करण्यासोबतच, देशाच्या रक्षणासाठी सज्ज असलेल्या सुरक्षा रक्षकांविषयी आपुलकीची भावना निर्माण करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. या राखी सीईओ संजय यादव यांच्या हस्ते युवा चेतना मंचच्या कार्यकर्त्यांकडे सोपविण्यात आल्या असून, या राखी रक्षाबंधनाच्या मूहूर्तावर भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लाहेरी, धोडराज येथील पोलीस जवानांना बांध्यात येणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, प्रमिला जखलेकर, रवी सुके, जयश्री जोशी, शोभना चौधरी, प्रवीण पाटील, कविता सातपुते, ठाकरे, मुख्याध्यापिका वंदना राऊत, दत्ता शिर्के, सुमीत भोयर, अभिषेक सावरकर, पंकज धुर्वे, अभिजित डायगणे, मृणाल लोही, वंदना साखरकर, धर्मेश रोकडे उपस्थित होते.

Web Title: Rakhi made by children from Nagalwadi left for police Naxalite area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.