राजू भद्रे, अनिल धावडेला अटक

By Admin | Updated: July 26, 2015 03:08 IST2015-07-26T03:08:12+5:302015-07-26T03:08:12+5:30

एका मृत महिलेच्या कोट्यवधीच्या मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार करून ही मालमत्ता हडपण्याचे प्रयत्न केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी कुख्यात गुंड राजू भद्रे आणि नगरसेवक अनिल धावडे ..

Raju Bhadre, Anil Rudra, arrested | राजू भद्रे, अनिल धावडेला अटक

राजू भद्रे, अनिल धावडेला अटक

मालमत्तेची बनावट कागदपत्रे बनविली : कोतवाली पोलिसांची कारवाई
नागपूर : एका मृत महिलेच्या कोट्यवधीच्या मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार करून ही मालमत्ता हडपण्याचे प्रयत्न केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी कुख्यात गुंड राजू भद्रे आणि नगरसेवक अनिल धावडे या दोघांना अटक केली. भद्रेला काही दिवसांपुर्वीच कोर्टाने पिंटू शिर्के प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे, हे विशेष!
महालमधील बडकस चौक आयचीत मंदिराजवळ शिंदुताई इलमुलवार यांचा २२९४.२९ चौरस फुटाचा भूखंड आहे. आज त्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. त्यांचा मृत्यू झाला. १९९२ पासून मालमत्तेला इलमुलवार यांच्याशिवाय दुसरा कुणीही वारसदार नसल्यामुळे ही मालमत्ता शासनाकडे जमा होणार होती. त्याची कुणकुण लागताच आरोपी नगरसेवक अनिल धावडे आणि कुख्यात गुंड राजू भद्रे या दोघांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने या भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार केली. एवढेच नव्हे तर तो कोट्यवधीचा भूखंड बळकावण्याचे प्रयत्न केले. दोन वर्षांपुर्वी या बनवाबनवी उघड झाल्यानंतर अनेक गुंडांच्या टोळळ्यांनी मालमत्ता बळकाण्याचे प्रयत्न केले. त्यातून हाणामा-याही झाल्या. परिणामी प्रकरण कोतवाली ठाण्यात गेले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपी राजू भद्रे, अनिल धावडे, प्रकाश केवलराम पाटील, धनवंताबाई प्रकाश पाटील, रवीकांत गणेश खोब्रागडे, गणेश गोवर्धन खोब्रागडे, नलिनी राजू बागडे, विजय फत्तेलाल भरड आणि सुनील ओमप्रकाश जुनेजा यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले. मात्र, भदे आणि धावडेची काही पोलिसांशी साटेलोटे असल्यामुळे त्यांना अटक करण्यास टाळाटाळ होत होती. (प्रतिनिधी)

Web Title: Raju Bhadre, Anil Rudra, arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.