राजुरा अत्याचाराची याचिका हायकोर्टाने काढली निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 03:37 IST2019-04-27T03:36:55+5:302019-04-27T03:37:05+5:30

फौजदारी रिट याचिका निकाली

Rajkumar Rape petition filed by High Court | राजुरा अत्याचाराची याचिका हायकोर्टाने काढली निकाली

राजुरा अत्याचाराची याचिका हायकोर्टाने काढली निकाली

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील इन्फन्ट जिजस इंग्लिश पब्लिक हायस्कूलमधील आदिवासी अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या कारवाईवर नागपूर खंडपीठाने शुक्रवारी समाधान व्यक्त केले व यासंदर्भातील फौजदारी रिट याचिका निकाली काढली.

तीन पीडित मुलींच्या आर्इंनी ही याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सहा पीडित मुलींना प्रत्येकी ५० हजार रुपये भरपाई अदा करण्याचा आदेश दिला होता. तसेच, बँकांनी पुढील आदेशापर्यंत कुणालाही ही रक्कम खात्यातून काढू देऊ नये असे स्पष्ट केले होते. न्यायालयाने याचिका निकाली काढल्यामुळे आता भरपाईची रक्कम बँक खात्यातून काढून घेता येईल.

आदिवासी मुलींवरील लैंगिक अत्याचार थांबविण्यासाठी प्रभावी धोरण तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात यावे अशी विनंती याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला केली होती. न्यायालयाने या विषयावर नवीन जनहित याचिका दाखल करण्याची सूचना याचिकाकर्त्यांना केली.

Web Title: Rajkumar Rape petition filed by High Court