राजीव गांधी यांची पुण्यतिथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:08 IST2021-05-23T04:08:31+5:302021-05-23T04:08:31+5:30
मांढळ : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मांढळ (ता. कुही) येथील बाजार चाैकात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. ...

राजीव गांधी यांची पुण्यतिथी
मांढळ : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मांढळ (ता. कुही) येथील बाजार चाैकात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व मालार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
तालुका काॅंंग्रेस कमिटीच्या वतीने आयाेजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला तालुका काॅंंग्रेस कमिटीचे अध्यक्ष उपासराव भुते, पंचायत समिती सदस्य मंदा डहारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर कुर्जेकार, सरपंच शाहू कुलंसगे, उपसरपंच सुखदेव जीभकाटे, पूनम वासनिक, विनय गजभिये, मोहन मते, सुधीर पिल्लेवान, भगवान दिघोरे, रामाजी दुधपचारे, डाॅ. भाऊराव डोळस, गोपीचंद सोनकुसरे, मनिराम डहारे, विनोद तिजारे, दीपक डहारे, मनोज पचबुद्धे, चंद्रकांत वाघमारे, लाला मैश्राम, लेखीराम ठवकर, गोपाल दिघोरे यांच्यासह काॅंंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित हाेते. यावेळी भाषणांमधून राजीव गांधी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. शिवाय, गरजू व रुग्णांना मास्क व फळांचे वितरण करण्यात आले. संचालक विनय गजभिये यांनी संचालन व आभार प्रदर्शन केले.