शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

राजगृह व्हावे सत्तेचे केंद्र :आनंदराज आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 12:25 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले मुंबईतील राजगृह हे सत्तेचे केंद्र व्हावे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कामाला लागा, असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी रमाई महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

ठळक मुद्देरमाई महोत्सव उत्साहात साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले मुंबईतील राजगृह हे सत्तेचे केंद्र व्हावे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कामाला लागा, असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी रमाई महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने भगवाननगर मैदानावर रमाई भीमराव आंबेडकर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर समाजकल्याण विभागाचे उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, रमेश जाधव, रिपब्लिकन मुव्हमेंटचे नरेश वाहणे उपस्थित होते.आनंदराज आंबेडकर पुढे म्हणाले, आंबेडकरी जनतेने सत्ता संपादन करायला हवी. यासाठी सर्व आंबेडकरी विचारवंत, साहित्यक, लोकांनी एका ठिकाणी आले पाहिजे. आपण विखुरले असल्याने आपली ताकद दिसत नाही. सध्याची स्थिती पाहता सर्वांना एकसंघ होण्याची गरज आहे. आरएसएस, भाजपची सत्ता घालविण्याचे आवाहनही त्यांनी केले. इंदू मिलची जागाही सरकार देण्याच्या तयारीत नव्हते. जनता आंदोलन करणार असल्याने सरकारने सुरक्षा भिंत मोठी केली होती. मात्र त्यानंतरही जनतेने आंदोलन केल्यानेच जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी रमाई यांच्या त्यागाच्या घटनांना उजाळा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात माता रमाईचे मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले. यावेळी ‘शिवाजी अंडग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या महानाट्याचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनात शीतल गडलिंग, शिरीष फुलझेले, अनिकेत कुत्तरमारे, सिद्धार्थ बनसोड, शुभम दामले, साकेत भगत, शुभम गडलिंग, सिद्धांत पाटील आदींचा सहभाग होता.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक