डॉ. राजेंद्र गवई यांची दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सचिवपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2023 20:50 IST2023-07-11T20:23:34+5:302023-07-11T20:50:10+5:30
Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची भदंत आर्य सुरई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली. मिटिंगमध्ये समितीच्या सचिवपदी डॉ. राजेंद्र गवई यांची निवड करण्यात आली.

डॉ. राजेंद्र गवई यांची दीक्षाभूमी स्मारक समितीच्या सचिवपदी निवड
नागपूरः डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची भदंत आर्य सुरई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली. मिटिंगमध्ये समितीच्या सचिवपदी डॉ. राजेंद्र गवई यांची निवड करण्यात आली. डॉ. सुधीर फुलझेले यांनी प्रकृतीच्या कारणामुळे समितीच्या सचिवपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. सचिव पदाकरिता डॉ. राजेंद्र गवई यांचे नाव डॉ. प्रदीप आगलावे यांनी सुचविले. तर विलास गजघाटे यांनी अनुमोदन दिले.
बैठकीत डॉ. कमलताई गवई, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, प्राचार्य. डी. जी. दाभाडे,एन. आर सुटे, विलास गजघाटे, डॉ. प्रदीप आगलावे, ऍड. आनंद फुलझेले, भदंत नागदिपांकर इत्यादी उपस्थित होते.