राजधानी एक्स्प्रेसमध्ये सैन्यातील जवानाने प्रवाशाला मारली गोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 00:31 IST2018-11-16T00:17:01+5:302018-11-16T00:31:13+5:30
राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशादरम्यान सैन्यातील एका जवानाने प्रवाशावर बंदुकीतून गोळी चालविली. या घटनेत प्रवासी गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी रात्री १०.४५ वाजता नागपूर-आमला मार्गावर घडली. या घटनेनंतर रेल्वे आमला स्थानकावर थांबविण्यात आली. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेला आरपीएफ कमांडंट ज्योति कुमार सतीजा यांनी दुजोरा दिला आहे.

राजधानी एक्स्प्रेसमध्ये सैन्यातील जवानाने प्रवाशाला मारली गोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशादरम्यान सैन्यातील एका जवानाने प्रवाशावर बंदुकीतून गोळी चालविली. या घटनेत प्रवासी गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी रात्री १०.४५ वाजता नागपूर-आमला मार्गावर घडली.
या घटनेनंतर रेल्वे आमला स्थानकावर थांबविण्यात आली. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेला आरपीएफ कमांडंट ज्योति कुमार सतीजा यांनी दुजोरा दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार, रेल्वे क्रमांक-१२४४१ बिलासपुर-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस नागपूरातून रवाना होऊन दिल्लीकडे जात होती. रेल्वेच्या एसी कोच बी-५ मध्ये सैन्याचे पाच जवान प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान जवानांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. त्यावेळी एक जवानाच्या हातातील बंदुकीतून गोळी सुटली. गोळी समोरच बसलेल्या अन्य प्रवाशाच्या पायाच्या खालील भागात लागली. त्यामुळे तो जखमी झाला. घटनेनंतर कोचमध्ये खळबळ उडाली. अन्य प्रवाशांनी जवानांवर रोष व्यक्त केला. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती जवळच्या आमला स्थानकाला दिली. त्यानंतर रेल्वे रात्री ११ वाजता आमला स्थानकावर पोहोचताच थांबविण्यात आली. स्थानकावर सैन्याच्या पाचही जवानांना शासकीय रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन जखमी प्रवाशाला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. वृत्त लिहिपर्यंत रेल्वे आमला स्थानकावर थांबविण्यात आली होती. जवानांनी स्थानकावर रेल्वे पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्याशी वाद घातल्याची माहिती आहे.