शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

राज ठाकरे यांनी सतत भूमिका बदलू नये, आपला पक्ष वाढवावा; रामदास आठवले यांचे प्रत्युत्तर

By आनंद डेकाटे | Updated: November 16, 2024 20:08 IST

केंद्रीय राज्यमंत्री आठवले हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी विदर्भात होते. त्यावेळी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज ठाकरे यांना आपला पक्ष बरखास्त करायची गरज नाही. त्यांनी आपला पक्ष वाढवावा, मीसुद्धा आपला पक्ष वाढवत राहील. परंतु त्यांनी सातत्याने आपली भूमिका बदलवू नये, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री व रिपाइं आठवले चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.

केंद्रीय राज्यमंत्री आठवले हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी विदर्भात होते. त्यावेळी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ‘रामदास आठवले यांच्याप्रमाणे मंत्रिपद मिळत असेल तर मी ते घेणार नाही. उलट माझा पक्षच बरखास्त करेल‘ अशाप्रकारचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यासंदर्भात आठवले यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी उपरोक्त प्रत्युत्तर दिले.

निवडणुकीसंदर्भात बोलताना आठवले म्हणाले, लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत वातावरण नाही. त्यावेळी विराेधकांनी संविधान धोक्यात आहे. आरक्षण संपणार, असा चुकीचा प्रचार केला होता. संविधान बदलले जाणार नाही, आरक्षण संपणार नाही, असा दावाही त्यांनी केला. विरोधकांकडून मुस्लीम आणि दलित समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पत्रपरिषदेला राजन वाघमारे, बाळू घरडे, डॉ. पूरण मेश्राम, विनोद थूल, अविनाश धमगाये उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRaj Thackerayराज ठाकरेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४