तेजसिंगराव राजे भोसले यांचे जेष्ठ सुपुत्र राजे लक्ष्मणसिंग भोसले यांचे निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 22:19 IST2017-08-19T22:19:03+5:302017-08-19T22:19:30+5:30

हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले

Raj Singh Laxmansingh Bhosale's eldest son of Tej Singh Rao Raje Bhosale passed away | तेजसिंगराव राजे भोसले यांचे जेष्ठ सुपुत्र राजे लक्ष्मणसिंग भोसले यांचे निधन 

तेजसिंगराव राजे भोसले यांचे जेष्ठ सुपुत्र राजे लक्ष्मणसिंग भोसले यांचे निधन 

नागपूर, दि. 19 - भोसले घराण्यातील माजी खासदार तेजसिंगराव राजे भोसले यांचे ज्येष्ठ सुपूत्र राजे लक्ष्मणसिंग भोसले यांचे निधन झाले आहे. शनिवारी दुपारी 3.30 वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. ते 51 वर्षांचे होते.

त्यांच्या पाश्चात पत्नी इंदिरा राजे भोसले, दोन मुली (अग्रेजा राजे भोसले, सयूंक्ता राजे भोसले), दोन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे. राजे लक्ष्मणसिंग भोसले शहरातील प्रसिद्ध उद्योजक होते. उद्या राविवारी  दुपारी २ वाजता भोसले राजवाडा महाल येथून अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. काशीबाई राजघाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

राजे लक्ष्मणसिंग भोसले माजी खासदार राजे तेजसिंग भोसले व माजी खासदार चित्रलेखाताई भोसले यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे जावई होते.
 

Web Title: Raj Singh Laxmansingh Bhosale's eldest son of Tej Singh Rao Raje Bhosale passed away