नागपुरात संत रविदास महाराजांचे स्मारक उभारा
By Admin | Updated: August 21, 2014 01:13 IST2014-08-21T01:13:53+5:302014-08-21T01:13:53+5:30
नागपूर रेल्वे स्थानकास संत रविदास महाराज यांचे नाव देण्यात यावे, श्री संत रविदास महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून शासनाने घोषित करावे, तसेच नागपूर व परिसरात चर्मकार समाज जास्त

नागपुरात संत रविदास महाराजांचे स्मारक उभारा
चर्मकार संघ : विभागीय आयुक्तांना निवेदन
नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकास संत रविदास महाराज यांचे नाव देण्यात यावे, श्री संत रविदास महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून शासनाने घोषित करावे, तसेच नागपूर व परिसरात चर्मकार समाज जास्त संख्येने असलेल्या ठिकाणी श्री संत रविदास महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन आमदार भोंडेकर व नगरसेवक डॉ़ परिणय फुके यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त यांना देण्यात आले़
महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यांमध्ये चर्मकार समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे़
समाजाचे आद्यदैवत श्री संत रविदास महाराज यांनी चौदाव्या शतकात समाजप्रवर्तनाचे तसेच देशात फिरून समानतेचा संदेश देण्याचे काम केले़.
डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ त्यांनी संत रविदासांच्या चरणी अर्पित केला़ संपूर्ण देशातील मागासवर्गीय समाजांमध्ये चर्मकार अर्थात रविदासीया समाज जास्त संख्येत आहे़ त्यामुळे समाजाच्या तिन्ही मागण्या शासनाने मंजूर कराव्यात, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला़
शिष्टमंडळात चर्मकार समाजाचे अध्यक्ष भय्यासाहेब बिघाणे, पंजाबराव सोनेकर, अनंत जगणित, जगन्नाथ सिरसकर, केशवराव सेवतकर, प्रा.डॉ़ अशोकराव थोटे, शामराव सरोदे, अखाडू कनोजे, धनराज मनघटे, प्रकाश कुहीकर, हिरालाल जगणे, शंकरराव भागवतकार, श्रीमती कल्पना बसेशंकर, कुसुमताई मालखेडे, इंद्रा चौधरी, शोभा चौधरी, भाऊराव तांडेकर, राजेश सोनेकर, महादेव बोडखे, शामराव चांदेकर, राजू मोहबे, माणिकराव रामेकर, नरेश घोरे, रमेश सटवे, अशोक अहिरवार, नरेश चौधरी, संतोष ठवरे, सतीश इंगोले, महेंद्र बारेकर, मनोज बिंझाडे, अनिल मोहबे, तिलक कनोजे, देवानंद छिपेकर, भोजराज हिंगणकर, संपत मोहबिया आदींचा समावेश होता़ (प्रतिनिधी)