लेब्राडोर, जर्मन शेफर्ड अन् अमेरिकन रॉट विलरची वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:10 IST2021-02-14T04:10:26+5:302021-02-14T04:10:26+5:30
नागपूर : शहरात विविध प्रजातींच्या श्वानांची मागणी सातत्याने वाढत आहे. पाळीव प्राण्यांच्या बाबतीत घरात उपलब्ध असलेल्या जागेच्या दृष्टीने नागरिक ...

लेब्राडोर, जर्मन शेफर्ड अन् अमेरिकन रॉट विलरची वाढली
नागपूर : शहरात विविध प्रजातींच्या श्वानांची मागणी सातत्याने वाढत आहे. पाळीव प्राण्यांच्या बाबतीत घरात उपलब्ध असलेल्या जागेच्या दृष्टीने नागरिक कोणत्या प्रजातीचा श्वान पाळायचा, हे ठरवितात. तज्ज्ञांच्या मते जर श्वानांचे मालक फ्लॅटमध्ये राहत असल्यास त्यांची पहिली पसंत पग, पेमोरियन आणि लासा बेग असते, परंतु लॉकडाऊनपासून लेब्राडोर, जर्मन शेफर्ड, अमेरिकन बुली आणि रॉट विलर या प्रजातीची मागणी अधिक होत आहे. मोठ्या घरात सुरक्षेच्या दृष्टीने जर्मन शेफर्ड, लेब्राडोर, अमेरिकन बुली, रॉट विलर, रेटरिएव्हर, रोटबेईलर, ग्रेट डेन, बॉक्सर, वुल्फ हॅब्रिड, अलास्कन मालाम्युट, डाबरमॅन अधिक पाळल्या जातात.
.........
श्वानांशी निगडित व्यवसायात ८० टक्क्यांनी वाढ
डॉग ब्रीडचा व्यवसाय करणारे गौरव कनोजिया यांच्यामते, लॉकडाऊनपासून आतापर्यंत डॉग ब्रीडच्या विक्रीत ८० टक्के वाढ झाली आहे. लॉकडाऊनमध्ये ज्या नागरिकांनी एकटा वेळ घालविला आहे, त्यांनी आता श्वान पाळण्यासाठी मन बनविले आहे, परंतु श्वान पाळण्यासाठी रजिस्ट्रेशन करावे लागते. ज्या प्रजातींना विदेशातून एक्स्पोर्ट केल्या जाते, त्या श्वानांची किंमत अधिक असते. त्यांना संपूर्ण कागदपत्रांसोबतच विकता येते. श्वानाचा जन्म झाल्यानंतर ४० दिवस त्यांना व्हॅक्सिन देण्यात येते. त्यानंतरच त्यांना विकता येऊ शकते.
आतापर्यंत कोणतेच स्थानिक कार्यालय नाही
कॅनल क्लबचे सहसचिव डॉ.कपिल मेंढे यांनी सांगितले की, श्वानांच्या ब्रीडसाठी रजिस्ट्रेशन करून घेतले जाते, परंतु शहरात कोणतेच स्थानिक कार्यालय नाही. त्यामुळे व्यवसाय करण्यासाठी कोणत्याच रजिस्ट्रेशनची गरज नाही. १० हजारांपेक्षा अधिक डॉग्स ब्रीड विना रजिस्ट्रेशननेच विकण्यात येत आहेत.
विना व्हॅक्सिनेशनचे श्वान विकणे धोक्याचे
पशुतज्ज्ञ डॉ.प्रज्ञेय ताकसांडे यांनी सांगितले की, काही श्वानांच्या प्रजाती अतिशय धोकादायक असतात. विदेशातून एक्स्पर्ट केलेल्या श्वानांना विना व्हॅक्सिन देता विकणे धोक्याचे ठरू शकते. क्रुएलिटी अॅक्टनुसार ब्रीडर व सप्लायर्स जागरूक झाल्यामुळे आता बाहेरून श्वान आणणे कमी झाले आहे. त्यामुळे श्वानांच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे.
................